Two policemen 'freestyle' at Bhusawal | भुसावळ येथे दोन पोलिसात ‘फ्रीस्टाइल’
भुसावळ येथे दोन पोलिसात ‘फ्रीस्टाइल’


भुसावळ : शहरातील यावल रोडवरील शासकीय विश्रामगृहाजवळ गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दोन पोलिसांमध्ये ‘फ्रिस्टाईल’ झाली. हा विषय दिवसभर चर्चेचा ठरला.
प्राप्त माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्यातील पो. कॉ. भूषण संजय चौधरी हे शासकीय विश्रामगृहाजवळ उभे असताना त्यांच्याजवळ गोपाळ रामचंद्र सोनवणे हा पोलीस कर्मचारी ( निश्चित पत्ता माहीत नाही ) दारूच्या नशेत आला. व भूषण चौधरी यांना शिवीगाळ करू लागला. तू भुसावळ येथे नोकरी कशी करतो तेच बघून घेईल , असा दमही त्यांनी भरला. यावेळी चौधरी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने पो. कॉ. चौधरी यांना मारहाण केली . यानंतर दोघांमध्ये जोरदार फ्रीस्टाईल सुरू झाली. त्यामुळे यावल रोडवर एकच गर्दी जमा झाली होती. यावेळी तेथे आलेल्या पो. कॉ. राजू नारायण परदेशी व संजय सोनवणे यांनी दोघांमधील वाद मिटविला. यानंतर भुषण चौधरी यांनी शहर पोलीस स्टेशनला येऊन गोपाळ सोनवणे याच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पो. कॉ. गोपाळ सोनवणे यांच्याविरुद्ध कलम ३३२ , ५०४,५०६,५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two policemen 'freestyle' at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.