ट्रकची दुचाकीला धडक दोघे जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 10:35 PM2019-10-20T22:35:23+5:302019-10-20T22:36:38+5:30

चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान दत्त मंदिरासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

Two killed in truck collision | ट्रकची दुचाकीला धडक दोघे जागीच ठार

ट्रकची दुचाकीला धडक दोघे जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्देचिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यानची घटनाखड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

मेहुणबारे, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान दत्त मंदिरासमोर खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी दुपारी तीनला ही घटना घडली. महामार्गावरील खड्डे हे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत.
चाळीसगावकडून घरी जाणाऱ्या चिंचगव्हाण, ता.चाळीसगाव येथील तरुणांच्या दुचाकीला मार्बल घेऊन जाणाºया ट्रकने खड्डे चुकविण्याच्या नादात जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, धडकेत दोन्ही तरुण जागीच ठार झाले. ट्रक रस्त्याच्या कडेला उलटली असून, ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथून चिंचगव्हाण येथे घरी दुचाकी (क्रमांक एमएच-१९-एझेड-३४०९) हिच्यावरुन दीपक रघुनाथ निकम (वय २१) व अमोल राजेंद्र वाघ (वय २१) हे घरी जात होते. घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला धुळ्याकडून चाळीसगावकडे मार्बल घेऊन जाणाºया ट्रक (क्रमांक एमएच-१८-एए-८१४७) भरधाव वेगात जात होती. चिंचगव्हाण फाटा ते खडकीसीम दरम्यान असलेल्या रस्त्यावर दत्त मंदिरासमोर ट्रकने दुचाकीला समोरून धडक देत उडविले. या धडकेने दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव रवाना करण्यात आले. याप्रकरणी विनोद पाटील यांनी माहिती दिली. त्यावरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two killed in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.