सेल्फीच्या नादात गुळी नदीच्या पाण्यात दोन मुले गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 09:16 PM2020-05-31T21:16:37+5:302020-05-31T21:18:58+5:30

चोपडा तालुक्यातील घटना

Two children were swept away in the water of Guli river in the sound of selfie | सेल्फीच्या नादात गुळी नदीच्या पाण्यात दोन मुले गेले वाहून

सेल्फीच्या नादात गुळी नदीच्या पाण्यात दोन मुले गेले वाहून

Next


चोपडा : वर्डी, ता.चोपडा येथे गुळी नदीच्या पाण्यात संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास दोन तरुण वाहून गेल्याची दुर्घटना घडली. सेल्फी काढत असताना ही घटना झाली. सध्या गुळी नदीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान हे मुले पाण्यात सेल्फी व फोटो काढण्यासाठी उतरले होते. नदीपात्रात दगडी बंधारा बांधला असून सेल्फी काढताना त्यावरून खाली वाहणाऱ्या पाण्यात ते पडले आणि वाहून बेपत्ता झाले. घटनास्थळी अडावद आणि चोपडा पोलीस दाखल झाले असून बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे. या घटनेतील एक मुलगा बचावला आहे. त्याने ही घटना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला.

Web Title: Two children were swept away in the water of Guli river in the sound of selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.