विराज कावडीया यांना त्रिमूर्ती कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:16 PM2020-09-25T21:16:25+5:302020-09-25T21:16:37+5:30

जळगाव : जागतिक फार्मासिस्ट (औषधनिर्माता) दिवसानिमित्त त्रिमूर्ती इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीतर्फे युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांना त्रिमूर्ती कोरोना योद्धा ...

Trimurti Corona Warrior Honor Award to Viraj Kawadia | विराज कावडीया यांना त्रिमूर्ती कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार

विराज कावडीया यांना त्रिमूर्ती कोरोना योद्धा सन्मान पुरस्कार

Next

जळगाव : जागतिक फार्मासिस्ट (औषधनिर्माता) दिवसानिमित्त त्रिमूर्ती इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीतर्फे युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांना त्रिमूर्ती कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले आहे. हा पुरस्कार त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रांजळ घोलप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कोरोना काळात कावडीया यांनी शिवसेना व युवाशक्ती फाऊंडेशनच्या माध्‍यमातून नागरिकांनासाठी जे सामाजिक व आरोग्यदायक कार्य केले त्याकरीता हा पुरस्कार देण्‍यात आला आहे. त्यांनी गरजूंना जेवण, किराणा, सेनितायझर, मास्क, वाटण्यात आले. होम कोरंटाईन करण्यास अनेक लोकांना मदत केली. या सह लोकांना कोरोना ग्रस्त रुग्णांना दवाख्यानात भरती होण्यासाठी योग्य ती मदतीसह लोकडाऊन वेळी नागरिकांना बाहेर गावी जाण्यासाठी पासेस काढण्यास सहकार्य केले आहे. या कार्याची दखल घेण्यात आली आहे.
 

Web Title: Trimurti Corona Warrior Honor Award to Viraj Kawadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.