पाल येथे घरी परतणाऱ्या आदिवासी कामगारांची पहूरच्या संघपतींनी भागविली भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:15 PM2020-03-30T15:15:21+5:302020-03-30T15:16:26+5:30

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : सिल्लोड येथून पाल, ता.रावेर येथे पायदळ निघालेले आदिवासी मजूर पहूर येथे सोमवारी सकाळी पोहोचले. पहूर ...

Tribal workers' appetite for tribal workers returning home to Pal | पाल येथे घरी परतणाऱ्या आदिवासी कामगारांची पहूरच्या संघपतींनी भागविली भूक

पाल येथे घरी परतणाऱ्या आदिवासी कामगारांची पहूरच्या संघपतींनी भागविली भूक

Next
ठळक मुद्दे५० किलो मीटरचा पायी प्रवासपोलिसांकडून मदतीचा हात

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : सिल्लोड येथून पाल, ता.रावेर येथे पायदळ निघालेले आदिवासी मजूर पहूर येथे सोमवारी सकाळी पोहोचले. पहूर जैन संघटनेचे संघपती यांचा परिवार धावून आला. यावेळी चाळीस ते पंचावन्न मजुरांना जेवण देऊन भूक भागविली व पुढे मार्गस्थ केले.
सिल्लोड येथे पाल येथील चाळीस ते पंचावन्न मजूर कामासाठी गेले होते. मात्र कोरोणा च्या संक्रमणामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावल्याने आपल्या लहान मुलांसह परिवाराला घेऊन पायदळ गावाकडे निघाले आहे. एवढे अंतर पार करून पहूर बसस्थानकात विसावा घेतला. यादरम्यान बंदोबस्तातील साहाय्यक गजानन ढाकणे, ज्ञानेश्वर बाविस्कर, जगदीश चौधरी या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पाणी व बिस्कीट अशी व्यवस्था करून ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करून दिली. जेवणासाठी जैन संघटनेचे संघपती हिरालाल छाजेड यांना आवाहन केले. त्यानुसार संजय हिरालाल छाजेड, संदेश छाजेड यांनी भाजप व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष ललित लोढा यांच्या जामनेर महामार्गावरील शेतात जेवनाची व्यवस्था करून दिली व सर्व मजुर पायदळ मार्गस्थ झाले. या माध्यमातून पहूर पोलीस व संघपती हिरालाल छाजेड यांचे व परिवाराचा माणुसकीचा ओलावा समोर आला आहे.

Web Title: Tribal workers' appetite for tribal workers returning home to Pal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.