सणासुदीत ‘मेगाब्लॉक’ प्रवासी ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 10:14 PM2019-10-22T22:14:23+5:302019-10-22T22:14:52+5:30

मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या ४ ते ५ तास लेट

Travelers' megablock blocked at festival | सणासुदीत ‘मेगाब्लॉक’ प्रवासी ताटकळले

सणासुदीत ‘मेगाब्लॉक’ प्रवासी ताटकळले

Next

जळगाव : रेल्वेतर्फे ऐन सणासुदीत मंगळवारी बºहाणपूर जवळ चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सकाळच्या सत्रातील मुंबईकडे जाणाºया अनेक सुपरफास्ट गाड्या ४ ते ५ तासांने विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांना स्टेशनावर गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले.
गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनातर्फे विविध तांत्रिक कामे हाती घेण्यात येत असल्यामुळे, प्रवाशांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात तर पावसामुळे अनेक गाड्या ८ ते १० विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास सहन करावा लागला. असे असतांना ऐन सणासुदीत रेल्वे प्रशासनातर्फे मंगळवारी खंडवा ते बºयानपुर दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान मेगाब्लॉक घ्यावा लागला.
यामुळे भुसावळहून मुंबईकडे जाणाºया अनेक सुपरफास्ट गाड्या वेळापत्रकानुसार ४ ते ५ तासाने विलंबाने धावल्या. खंडवा ते बºहाणपूर दरम्यान सुरु असलेल्या मेगाब्लॉकच्या कामामुळे अनेक गाड्या विविध स्टेशनवर थांबविण्यात आल्या होत्या.
निवडणुकीच्या कामात लालपरी अडकल्याने प्रवाशाचींही गैरसोय
सोमवारी जळगाव आगारातील २५ बसेस निवडणूक कामासाठी घेण्यात आल्या होत्या. रात्री उशिरा या बसेस आगारात दाखल झाल्या. यामुळे सायंकाळी घराकडे जाणाºया प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते. तर दुसºया दिवशी पुन्हा गुजरातहून मागविलेल्या पोलीस बंदोबस्तला सोडण्यासाठी नऊ बसेस सोमवारी पहाटे गुजराथला रवाना झाल्या. तर पाच बसेस मुंबईच्या पोलिसांना सोडण्यासाठी गेल्या. यामुळे काही गावांच्या फेऱ्यांवर परिणाम होऊन, प्रवाशांना पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागला.
हजारो प्रवासी स्टेशनावर ताटकळले
मेगाब्लॉकमुळे भुसावळहून मुंबईकडे जाणाºया काशी एक्सप्रेस साडेचार तास लेट, कर्नाटक एक्सप्रेस तीन तास, मुंबई एलटीटी एक्सप्रेस तीन तास, पुष्पक चार तास, कामायानी एक तास व कुशीनगर एक्सप्रेस दोन तासाने विलंबाने धावली. विशेष म्हणजे जळगाव स्टेशनावर मुंबईला जाण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत एकही गाडी उपलब्ध नव्हती. यामुळे नाशिक-मुंबईकडे जाणाºया प्रवाशांना स्टेशनावरच गाडीची वाट पहात ताटकळत बसावे लागले. या प्रकाराबद्दल प्रवाशांतर्फे रेल्वेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

Web Title: Travelers' megablock blocked at festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव