Transfers of Police Officers in Nashik range | नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिका-यांच्या बदल्या
नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिका-यांच्या बदल्या

ठळक मुद्दे जळगावचे निरीक्षक नजन पाटील, संदीप पाटील नंदूरबारलासागर शिंपी, मनजितसिंग चव्हाण नाशिक दीपक गंधाले,सचिन बागुल अहमदनगरला

जळगाव : नाशिक परिक्षेत्रांतर्गत पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या शनिवारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोर्जे यांनी केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील पीएसआय दर्जाच्या ११ जणांची बदली असून इतर जिल्ह्यातून १७ जण बदली होऊन येणार आहेत. तर सपोनि दर्जाच्या १२ जणांची बदली झाली असून इतर जिल्ह्यातून ६ जण येणार आहेत.
पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांची नंदूरबारला बदली झाली आहे.आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, राजू रसेडे, केलसिंग पावरा, एलसीबीचे सागर शिंपी, दत्तात्रय पवार, हेमंत कडूकार हे नाशिक ग्रामिण येथे, पोलीस अधीक्षकांचे वाचक संदीप पाटील नंदुरबार येथे, वरणगावच्या सारीका कोडापे धुळे येथे तर सुजित ठाकरे,मारवडचे समाधान पाटील, अपर पोलीस अधीक्षकांचे वाचक सचिन बागुल हे नगर येथे जाणार आहेत. तर सचिन जाधव नगरवरून, संदीप बोरसे, सुहास राऊत, रावसाहेब किर्तीकर, राहुल पुष्ठला, प्रविण साळुंखे हे नाशिक ग्रामिण येथून जळगाव जिल्ह्यात येणार आहे. तर भुसावळ वाहतूक शाखेचे दीपक गंधाले यांची विनंतीवरून नगर येथे बदली करण्यात आली आहे.
यात पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, दिपक ढोमणे, भुसावळचे नाना सूर्यवंशी, पंकज शिंदे, चाळीसगावचे राजेश घोळवे हे अहमदनगर येथे, वैष्ठलाससिंग पाटील, अडावदचे गजानन राठोड, गणेश आखाडे, शेख मोहम्मद अब्दुल रहेमान हे नाशिक ग्रामिण तर नियंत्रण कक्षाचे सुरेश सपकाळे हे धुळे येथे जाणार आहेत. दिलीप पाटील यांची बदलीला स्थगीती दिली आहे. तर अहमदनगर येथून जिल्ह्यात राजेंद्र पवार, सिध्देश्वर गोरे, वैभव पेटकर, महावीर जाधव तर धुळ्यावरून राजेंद्र माळी, राजेंद्र मांडेकर, जगतसिंग महाले, दिलीप माळी, शेखर सावळे, हर्षा जाधव हे येणार असून नाशिक ग्रामिण वरून वैष्ठलास आकुले, स्वप्नील नाईक, भाईदास मालचे, गणेश सूर्यवंशी हे अधिकारी येणार आहेत. तसेच विनंती वरून रामकृष्ण खैरनार यांची नंदुरबार येथे बदली झाली असून नाशिक ग्रामिण वरून राहूल पाटील, युवराज अहिरे, किर्ती जावरे हे येणार आहेत. 
 पोलिस निरीक्षक किसन लक्ष्मण नजन पाटील यांची नंदुरबार येथे बदली झाली असून नंदुरबारवरून काशीनाथ गंगाराम पवार जळगावला येणार आहेत. बदल्यांमुळे पोलिस दलामध्ये याची चर्चा होती.


Web Title: Transfers of Police Officers in Nashik range
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.