ट्रकमध्ये कोंबून कामगारांची वाहतूक, ९५ जणांविरुध्द गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:14 PM2020-03-31T23:14:26+5:302020-03-31T23:15:04+5:30

अजिंठा चौकात पकडले

Traffic lawsuits against 59 people registered | ट्रकमध्ये कोंबून कामगारांची वाहतूक, ९५ जणांविरुध्द गुन्हे दाखल

ट्रकमध्ये कोंबून कामगारांची वाहतूक, ९५ जणांविरुध्द गुन्हे दाखल

Next

जळगाव : जमावबंदी आदेशवसीमाबंदीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी असतानाही मुंबई येथून ट्रकमधून उत्तर प्रदेशात जाणाºया ९५ जणांना सोमवारी मध्यरात्री सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी अजिंठा चौकात पकडले. दरम्यान, ट्रक चालकासह या सर्व जणांविरुध्द कलम १८८ अन्वये एमआयडीसी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन हे सोमवारी रात्री विभागीय गस्तीवर होते. रात्री १ वाजता अजिंठा चौकातून जात असताना मुंबईकडून येणारा ट्रक रोहन यांनी थांबविला असता त्यात जनावरांसारखे ९५ जण कोंबून व दाटीवाटीने बसलेले होते. आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना या लोकांनी केलेल्या नव्हत्या. अधिक चौकशी केलीअसताहे सर्व कामगार असून मुंबईत वेगवेगळ्या भागात काम करीत होते. संचारबंदीमुळे उद्योगधंदे बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली, त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशातील गावाकडचा रस्ता पकडला होता. विशेष म्हणजे मुंबईहून निघालेल्या या ट्रकला नाशिक, धुळे, इगतपुरी, ठाणे, कल्याण येथे कोणीही अडविले नाही किंवा टोलनाक्यावर विचारपूस झाली नाही. जळगाव शहरात प्रवेश केल्यावर हे वाहन डॉ.नीलाभ रोहन यांच्या निदर्शनास आले. अंगरक्षक विजय काळे यांनी एमआयडीसी पोलिसांना पाचारण करुन या कामगारांना राधाकृष्ण मंगल कार्यालयात रवाना करण्यात आले. तेथे सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी व निवारा तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
तोंडाला मास्क न लावणाºया पाच जणांविरुध्द गुन्हा
कोरोना या संर्सगजन्य आजारापासून संरक्षण होण्याकरीता घराबाहेर निघालेल्या प्रत्येक व्यक्तीने तोंडाला मास्क किंवा रुमाल लावणे बंधनकारक आहे, मात्र त्याची अंमलबजावणी न करणाºया पाच वाहनचालकांविरुध्द एमआयडीसी पोलिसात कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अन्वर शब्बीर कुरेशी (३० रा. मासुमवाडी जळगाव), हमीद लालखॉ पठाण्(४४ रा. मेहरुण), दीपक रामचंद्र्र ठाकूर (२८ रा. वराडसीम ता. भुसावळ), राजाराम सोपान अपार (४६ रा. खुबचंद साहित्यानगर) व गणेश कडुबा घोंगडे (२४ रा.पहुर) यांचा त्यात समावेश आहे. हे वाहनधारक कोणतीही खबरदारी न घेता तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावता विनाकारण फिरताना अजिंठा चौफुली परिसरात आढळून आले. पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील ,रामकृष्ण पाटील, राजेंद्र ठाकूर, कृष्णा पाटील , श्रीकांत बदर ,चेतन सोनवणे, सचिन पाटील व योगेश बारी यांनी ही कारवाई केली.

Web Title: Traffic lawsuits against 59 people registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव