मुक्ताईनगर तालुक्यात तोकडी आरोग्य व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:36 PM2020-08-13T23:36:00+5:302020-08-13T23:37:30+5:30

तालुक्यातील एक लाख ५९ हजार लोकसंख्येला एक उपजिल्हा रुग्णालय चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २२ उपकेंद्रामार्फत आरोग्य सेवा पुरवल्या जात आहे. ही सेवा जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार सोडा स्वातंत्र्य उत्तर भारताने स्वीकारलेल्या जोसेफ विल्यम भोरे यांच्या शिफारशीनुसार ही आरोग्य सेवा परी पूर्ण झालेली नाही.

Tokdi health system in Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यात तोकडी आरोग्य व्यवस्था

मुक्ताईनगर तालुक्यात तोकडी आरोग्य व्यवस्था

googlenewsNext
ठळक मुद्दे६४०० लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे.वैद्यकीय अधिकाऱ्याची निम्मे पदे रिक्त

मतीन शेख
मुक्ताईनगर : तालुक्यातील एक लाख ५९ हजार लोकसंख्येला एक उपजिल्हा रुग्णालय चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २२ उपकेंद्रामार्फत आरोग्य सेवा पुरवल्या जात आहे. ही सेवा जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार सोडा स्वातंत्र्य उत्तर भारताने स्वीकारलेल्या जोसेफ विल्यम भोरे यांच्या शिफारशीनुसार ही आरोग्य सेवा परी पूर्ण झालेली नाही. अपूर्ण डॉक्टर संख्या आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण देत तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा सुरू आहे. ६४०० लोकसंख्येमागे एक डॉक्टर आहे.

उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक असलेल्या ८ पैकी ४ वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा रिक्त आहेत तर चार प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ कर्मचारी कमी आहेत. २२ उपकेंद्रापैकी ११ उपकेंद्रात सीएचओ पद असलेले डॉक्टर्स नाहीत. पाठोपाठ ग्रामीण भागात ७८ गावांमध्ये फक्त ३५ खासगी डॉक्टर्स आहेत.

तोकडी आरोग्य व्यवस्था
प्रत्येक ४० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र १० ते २० हजार लोक संख्ये मागे ७५ खाटाचें रुग्णालय आणि ५ हजार लोकसंख्या मागे एक आरोग्य उपकेंद्र अशी सार्वजनिक आरोग्य सेवा अपेक्षित असल्याचे विल्यम जोसेफ भोरे यांची शिफारस स्वातंत्र्य उत्तर देशाने स्वीकारली होती.
या अनुषणगाने मुक्ताईनगर तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवेचा धांडोळा घेतला असता १ लाख ५९ हजार लोकसंख्येसाठी तालुक्यात मुक्ताईनगर शहरात एक उपजिल्हा रुग्णालय, रुईखेडा, अंतुर्ली, उचंदे आणि कुºहा असे ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तर २२ उपकेंद्र आहेत. यावर आरोग्य यंत्रणा काम धकवत असली तरीही व्यवस्था तोकडी असल्याचे चित्र आहे.


उचंदे प्रथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ३० गावे येतात त्यांची लोकसंख्या ३० हजार १३१ इतकी आहे.या ठिकाणी २ वैद्यकीय अधिकारी ५ आरोग्य सेविका ३ आरोग्य सेवक, २ आरोग्य सहायक एक औषध निर्माता एक ड्रेसर अशी कर्मचारी संख्या येथे २ शिपाईची पदे रिक्त आहे आहे.

२० गावांची आरोग्य सेवा
अंतुर्ली प्रथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २० गावांचा समावेश आहे. त्यांची लोकसंख्या २९ हजार १६५ इतकी आहे. या ठिकाणी २ वैद्यकीय अधिकारी ५ आरोग्यसेविका ३ आरोग्यसेवक, २ आरोग्य सहायक एक औषध निर्माता एक ड्रेसर अशी कर्मचारी संख्या आहे. यात १ आरोग्य सेविका आणि १ ड्रेसर आणि २ शिपाई ही ४ पदे रिक्त आहे.

५७ हजार लोकसंख्येचा भार
रुईखेडा प्रथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ३३२ गावे येतात. त्यांची लोकसंख्या ५७ हजार ७१९ इतकी आहे. यात मुक्ताईनगर शहरी भागाचा समावेश आहे. या ठिकाणी २ वैद्यकीय अधिकारी, ६ आरोग्यसेवक, ८ आरोग्यसेविका, २ आरोग्य सहायक एक औषध निर्माता, एक ड्रेसर अशी कर्मचारी संख्या आहे. यात आरोग्य सहाय्यिका व एक शिपाई हे पद रिक्त आहे.

१० पदे रिक्त
कुºहा प्रथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ३९ गावे येतात. त्यांची लोकसंख्या ५० हजार इतकी आहे. या ठिकाणी २ वैद्यकीय अधिकारी, ८ आरोग्यसेविका, ७ आरोग्यसेवक, २ आरोग्य सहायक, एक औषध निर्माता, एक ड्रेसर अशी कर्मचारी संख्या आहे. येथे दोन आरोग्य सहाय्यक दोन आरोग्य सेवक, एक औषध निर्माता एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक ड्रेसर, २ शिपाई, १ स्वीपर अशी एकूण १० पदे रिक्त आहेत.

२२ उपकेंद्रे ११ डॉक्टर
लोकसंख्येच्या आधारावर तालुक्यात ३२ आरोग्य उपकेंद्र अपेक्षित असताना फक्त २२ आरोग्य उपकेंदे्र आहेत. यात ११ ठिकाणी सीएचओ म्हणून डॉक्टरांची नेमणूक आहे तर ११ आरोग्य उपकेंद्रांना डॉक्टरांची प्रतीक्षा आहे. मुक्ताईनगर शहरात ५ उपकेंद्र मंजूर आहेत. यात २ कार्यान्वित आहेत तर एका उपकेंद्राच्या इमारतीत तलाठी कार्यालय सुरू आहे.

६ प्रभारी वैद्यकीय अधिकारी
तालुक्यातील कुºहा प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता रुईखेडा, उचंदे आणि अंतुर्ली या तिन्ही ठिकाणी कायम वैद्यकीय अधिकारी पोस्टिंग असताना येथे नेहमी प्रभारी वैद्यकीय अधिकाºयावर काम भागविले जात आहे. सध्या या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ प्रभारी नेमणूक असलेले वैद्यकीय अधिकारी काम पाहत आहे.

उपजिल्हा रुग्णालयात ४ डॉक्टर कमी
शहरात उपजिल्हा रुग्णालयात लोक सहभागातून आॅक्सिजन पाईपलाईन टाकली गेली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने सेमी व्हेंटिलेट कक्ष आणि इतर सुविधा उपलब्ध झाल्या. रुग्णांसाठी कोरोना काळात दिलासादायक स्थिती येथे आहे. मात्र ८ वैद्यकीय अधिकारी नेमणूक असताना येथे अवघ्या ४ वैद्यकीय अधिकाºयांवर काम भागविले जात आहे.

२० हजार नागरिकांची स्क्रिनिंग
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाºया चार प्राथमिक आरोग्य केंद्र २२ उपकेंद्र आणि तीन आयुष डिस्पेनसरी यांच्यामार्फत कोरोना काळात आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करीत आहे. आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांची स्क्रिनिग या कर्मचाºयांंनी पार पडली आहे. गावात वाड्या-तांड्यावर आरोग्य तपासणीसाठी कर्मचारी गुंतले आहे.

७६ खासगी डॉक्टर
खासगी आरोग्यसेवेत शहरात ४१ आणि ग्रामीण भागात ३५ असे ७६ डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहे. यात शहरात एमबीबीएस आणि तज्ज्ञडॉक्टरांची संख्या १० आहेत. कोरोना काळात खासगी डॉक्टरांची सेवा सावध पवित्रा घेऊन सुरू आहे, तर खासगी रुग्ण तपासणीत सर्दी खोकला दम्याचे रुग्ण नोंदी करून आरोग्य सेवेकडे माहिती द्यावी लागत आहे.

Web Title: Tokdi health system in Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.