हुडकोत पोलिसांवरच दगडांचा मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:58 AM2020-07-08T11:58:58+5:302020-07-08T11:59:25+5:30

फौजदारासह पोलीस कर्मचारी जखमी : ८ जणांना केले अटक

Throw stones at the police in Hudkot | हुडकोत पोलिसांवरच दगडांचा मारा

हुडकोत पोलिसांवरच दगडांचा मारा

Next

जळगाव : पिंप्राळा हुडकोतील सिध्दार्थ नगरात सोमवारी रात्री दोन गटात वाद होऊन दंगल उसळली. धारदार शस्त्र, लाठ्याकाठ्यांचा वापर यात झाला. दंगलीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आलेल्या रामानंद नगर पोलिसांवरच जमावाने दगडांचा मारा केला. त्यात सहायक फौजदार गोपाळ चौधरी व रुपेश सुरेश ठाकरे हे पोलीस कर्मचारी जखमी झाले तर एका गटातील चारजण जखमी झाले. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या २९ जणाविरुध्द दंगल व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला या घटनेत किरण किशोर खैरनार, रंजना किशोर खैरनार, शुभम पवार व विजय नाना कदम हे जखमी झाले तर या घटनेप्रकरणी भागवत रामचंद्र सुरवाडे, दीपक जगन भालेराव, बापू प्रकाश सोनवणे, राजू वसंत निकम, वसंत नथ्थू निकम, शंकर वसंत निकम, राहूल नामदेव इंगळे, हितेश नाना बाविस्कर, लताबाई नाना बाविस्कर, सविता दीपक भालेराव, सीमा भागवत सुरवाडे, ज्योती पिंटू भालेराव, छाया वसंत निकम, कल्पना अशोक सपकाळे, वर्षा संजय पवार, गीता दगडू बिºहाडे, रेखा गोपाळ कचोरे, पूजा किरण सपकाळे, किरण अशोक सपकाळे, चेतन बाविस्कर, फकिरा अडकमोल, राहूल गजरे, अजय अशोक सपकाळे, विजय नाना कदम व आनंदा प्रकाश सोनवणे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला, तर सुरवातीच्या आठ जणांना अटक झाली आहे.

अदखलपात्र गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणे भोवले
गेल्या आठवड्यातच याच भागात दोन गटात वाद झाला होता. तेव्हा एका महिलेला एकटी पाहून बेदम मारहाण झाली होती. तेव्हा महिलेने रामानंद नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्याची अदखलपात्र म्हणून पोलिसांनी नोंद घेतली, मात्र पुढे चौकशी करणे टाळले, त्याचाच परिणाम म्हणून सोमवारी पुन्हा हेच दोन गट लाठ्याकाठ्या व शस्त्र घेऊन एकमेकावर चालून आले. तेव्हाच तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली असता तर ही दंगलीची घटना टाळता आली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पोलीस चौकी असून नसल्यासारखी
पिंप्राळा हुडकोत प्रवेश करतानाच चौकात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. या पोलीस चौकीवर कधीच कर्मचारी थांबत नसल्याची ओरड आहे. थांबत असतील तर ते फक्त कागदोपत्रीच. त्यामुळे या भागात पोलिसांचा दबदबा राहिलेला नाही. दारु, सट्टा यासारखे अवैध धंदेच या वादांना कारणीभूत ठरत आहेत. गावठी दारु विक्री करणाऱ्यांची मोठी संख्या या भागात आहे. किरकोळ कारणावरुन हुडकोत नेहमीच दंगल झालेली आहे. पोलिसांसाठी हा भाग ‘हॉटस्पॉट’ ठरलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.

Web Title: Throw stones at the police in Hudkot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.