मुक्ताईनगरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 06:29 PM2020-09-24T18:29:52+5:302020-09-24T18:30:15+5:30

मुक्ताईनगरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी पार पाडला.

Three-day public curfew in Muktainagar successful | मुक्ताईनगरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी

मुक्ताईनगरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी

googlenewsNext

मुक्ताईनगर : शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेली रुग्ण संख्या बघता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी सोमवार, मंगळवार व बुधवार असे तीन दिवस ‘बंद’ पाळला. बंद शांततेत पार पाडला.
मुक्ताईनगर बंदसाठी आमदार चद्रकांत पाटील, तहसीलदार श्याम वाडकर, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन जैन यांनी सर्व व्यापाऱ्यांशी चर्चा करून मुक्ताईनगर शहर तीन दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यात दवाखाने, मेडिकल व दूध डेअरी वगळता संपूर्ण मुक्ताईनगर शहर १०० टक्के तीन दिवस बंद होते. व्यापाºयांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व्यापारी संघटनेने आभार मानले आहेत.

 

Web Title: Three-day public curfew in Muktainagar successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.