तहानलेल्या ‘मन्याड’ धरणलाही लागली भरण्याची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:55 PM2019-09-24T18:55:35+5:302019-09-24T18:56:41+5:30

मन्याड परिसरातील २२ गावांचे तारणहार असलेल्या ‘मन्याड’ धरणालाही आता पाण्याची ओढ लागली आहे.

The thirsty 'Manad' Dam was also filled with hope | तहानलेल्या ‘मन्याड’ धरणलाही लागली भरण्याची आशा

तहानलेल्या ‘मन्याड’ धरणलाही लागली भरण्याची आशा

Next
ठळक मुद्देपिकासाठी शेतकºयांच्या आशा पल्लवितयाआधी मन्याड धरण ४ आॅक्टोबर २०१६ रोजी १०० टक्के भरले होते

आडगाव/सायगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : मन्याड परिसरातील २२ गावांचे तारणहार असलेल्या ‘मन्याड’ धरणालाही आता पाण्याची ओढ लागली आहे.
मन्याड धरण १० सप्टेंबरपर्यंत कोरडेठाक होते. त्यानंतर धरण परिसरात पाऊस पडला. १७-१८ तारखेपर्यंत धरणाने शून्याचा आकडा पास केला. त्यानंतर १९ व २० रोजी नांदगाव परिसरात समाधानकारक पाऊस पडल्याने मन्याड धरणाच्या वर असलेले माणिकपुंज धरण १०० टक्के भरल्याने त्याचा विसर्ग मन्याड धरणात होऊ लागला. साधारणत: दोन ते अडीच हजार क्युसेस पाणी मन्याड धरणात येऊ लागले आहे. या धरणात २१ रोजी उपयुक्त साठ्यात सव्वा ते दीड फुटाने वाढ झाली. वरील सखल भागात दोन दिवस पाऊस न पडल्याने वरील धरणाचा विसर्ग कमी झाला. २२ रोजी मन्याड धरणात फक्त दीड /दोन फुटाने वाढ झाली. २३ रोजी माणिकपुंज धरणातून होणारा विसर्ग २०० ते २५० क्युसेसने सुरू होता. त्याच्याने सकाळी अकरा-बारापर्यंत मन्याड धरण साडेपाच टक्क्यांपर्र्यंत पोहचले. थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीने मन्याड धरणाचा लेटलतीफ प्रवास सुरू झाल्याने देर है, लेकीन अंधेर नही असे म्हणण्याची वेळ मन्याड परिसरातील नागरिकांवर आली आहे.
पावसाळ्यातील आॅगस्ट महिना संपला तरीदेखील मन्याड परिसरात पाऊसच नसल्याने शेतकरी, शेतमजूर, नागरिक चांगलेच धास्तावले होते. गेल्यावर्षी शून्यावर असलेले धरण यावषीर्ही शून्यावरच राहते की काय, असा प्रश्न पडला होता. पोळा सणदेखील सायंकाळपर्यंत कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली होती. परंतु पोळ्याच्या रात्रीच मन्याड परिसरात पहिलाच दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांंच्या आशा पल्लवित झाल्या. पोळ्यानंतर मन्याड परिसरात खरा पावसाळा सुरू झाल्याने कोरड्याठाक विहिरींनीही आतापर्यंत पन्नाशी गाठली. त्यामुळे मन्याड परिसरातील नागरिकांचे निम्मे जलसंकट कमी झाले आहे.
मन्याडही १०० टक्के भरावे
जिल्ह्यातील बहुतेक धरणांनी सरासरी ओलांडल्याने त्याला अपवाद आहे फक्त मन्याड धरण व पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरण. तेही म्हसवे धरणातून कालव्याद्वारे भरले जात आहे. प्रश्न आहे तो मन्याड धरणाचा. परतीच्या पावसाने मन्याडदेखील १०० टक्के भरावे, अशी अपेक्षा मन्याड परिसरातील नागरिक करीत आहे. नांदगाव परिसरात व धरण परिसरात अजून दोन/ तीन दमदार पाऊस झाल्यास लवकरच मन्याडही शतकाकडे वाटचाल करेल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.
सायगाव येथून जवळ असलेल्या मन्याड धरणात पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. यामुळे पीक घेण्यासाठी शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माणिक पुंज धरण १०० टक्के भरल्याने मन्याड धरण भरण्यासाठी आता अडचण येणार नाही. पण त्यासाठी दोन ते तीन दमदार पावसाची प्रतीक्षा अजून कायम आहे. त्यामुळे मन्याड धरणावर अवलंबून राहणाºया खेड्यांचा प्रश्न काही अंशी मार्गी लागणार आहे. याआधी मन्याड धरण ४ आॅक्टोबर २०१६ रोजी १०० टक्के भरले होते.

Web Title: The thirsty 'Manad' Dam was also filled with hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.