पोषण आहाराची निविदा आता नव्याने राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:33 PM2020-02-23T12:33:35+5:302020-02-23T12:34:13+5:30

ठेका संपला, नित्कृष्ट मालावरही लक्ष ठेवण्याची गरज

The tender for the nutrition diet will now be renewed | पोषण आहाराची निविदा आता नव्याने राबविणार

पोषण आहाराची निविदा आता नव्याने राबविणार

Next

जळगाव : पोषण आहाराच्या धान्यादी मालाचा पुरवठा करण्याचा वर्षभराचा करार संपला आहे़ अनेक शाळांमधील विद्यार्थी पोषण आहाराअभावी असल्याचा मुद्दा समोर येत असतानाच आता नव्याने ही निविदा राबविली जाणार आहे. दरम्यान, नित्कृष्ट मालाचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
वर्षभरासाठी गुनिना कमर्शियल्सला हा ठेका देण्यात आला होता़ दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुरवठादाराकडून देण्यात येणाऱ्या धान्यादी मालाच्या किमती या पुणे, नागपुरपेक्षाही कितीतरी अधिक असल्याचे समोर आले होते, शिवाय बाजारातील भावापेक्षा हा माल अधिक किमतीने घेतला जात होता़ शिवाय हा माल निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या़ मात्र, हे त्या-त्या वेळचे बाजाराची परिस्थिती बघून दर ठरविले जातात, असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाकडून देण्यात आले होते़ आता विद्यार्थ्यांपर्यंत योग्य पोषण पोहचविण्याकडे लक्ष दिले जाईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
शिक्षणाधिकारी मिळणार कधी
अत्यंत महत्त्वाचा अशा प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार वर्ष-दीड वर्षापासून वाºयावर सुरू आहे़ निर्णय प्रक्रियेत अधिकारी एकमेकांवर चालढकल करीत असून नेमके या विभागाला अधिकारी मिळणार कधी व शिक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रिया नेमक्या सुरळीत होणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़

Web Title: The tender for the nutrition diet will now be renewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव