निगेटीव्ह अहवालानंतर कोविडची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:03 PM2020-07-03T13:03:51+5:302020-07-03T13:06:43+5:30

१६ निगेटीव्ह रुग्ण कोविड रुग्णालयात आॅक्सिजनवर : अहवालांच्या शाश्वतीवर प्रश्नचिन्ह

Symptoms of covid after negative report | निगेटीव्ह अहवालानंतर कोविडची लक्षणे

निगेटीव्ह अहवालानंतर कोविडची लक्षणे

googlenewsNext

जळगाव : कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह येऊनही अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत. त्यात खासगी तसेच शासकीयस्तरावरही आता कोरोना चाचण्यांच्या शाश्वतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे़ काही प्रकरणात तीस ते चाळीस टक्के या चाचण्या बदलूही शकतात, असे डॉक्टर्सकडून सांगण्यात येत आहे़ याशिवाय निगेटीव्ह रिपोर्ट आलेले १६ रुग्ण कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना आॅक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी एका महिलेला अहवाल निगेटीव्ह आल्याने तसेच त्या ठिकाणी व्हँटीलेटरर्स उपलब्ध नसल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते़ मात्र, आॅक्सिजनची पातळी खालावली असल्याने खासगी रुग्णालयांनी व्हँटीलेटर्स खाली नसल्याच्या सबबी देत या महिलेला दाखल करून घेतले नव्हते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्यावर या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला़ यामुळे अहवाल व आॅक्सिजनची क्षमता हे दोन मुद्दे प्रकर्षाने समोर आले आहेत़ काही प्रकरणांमध्ये पहिला अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर दुसरा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची काही प्रकरणे समोर आल्यामुळे आता या मुद्द्यांवर चर्चा सुरू झालेल्या आहेत़
आॅक्सिजनची पातळी कमी असलेल्या रुग्णांमध्ये अहवालाची शाश्वती ही ६० ते ७० टक्केच असू शकते़ अनेक वेळा निगेटीव्ह अहवाल असतानाही लक्षणे सर्व कोविडसारखी असल्याने अशा रुग्णांना डिस्चार्ज देता येत नाही, शिवाय बाहेरही कोणी घेत नाही़ त्यामुळे सद्यस्थितीत अशा १६ रुग्णांना कोविड रुग्णालयातच दाखल करण्यात आले असून अहवाल निगेटीव्ह असतानाही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़
अशी माहिती रुग्णालयातून मिळाली़ कोविड ही पूर्णत : नवीन चाचणी असून त्यात काही प्रकरणात अहवाल बदलू शकतात, असाही दावा डॉक्टरांकडून केला जात आहे़
खासगी डॉक्टर्सची भूमिका
ज्या रुग्णांना न्यूमोनिया आहे किंवा आॅक्सिजनची क्षमता, पातळी कमी आहे, अशा रुग्णांना शासकीय यंत्रणेने डिस्चार्जच देऊ नये त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, हे रुग्ण कोविड बाधित असण्याची शक्यता अधिक असते, अशा स्थितीत त्यांना दाखल करून घेणे म्हणजे अन्य नॉन कोविड रुग्णांच्या जिवाचा धोका पत्करणे असल्याने असे रुग्ण न घेण्याची खासगी डॉक्टर्सची भूमिका आहे़
अनेक रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आहेत़ मात्र, आॅक्सिजनची क्षमता खूपच कमी असल्याने अशांना आपण कोविड रुग्णालयातच दाखल केले आहे़ कमी लक्षणे असलेल्यांना सध्या डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात हलविले आहे़
- डॉ़ जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव

Web Title: Symptoms of covid after negative report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव