रावेरजवळील क्रूर हत्या प्रकरणी मुलीवर अत्याचाराचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:03 AM2020-10-17T01:03:48+5:302020-10-17T01:06:56+5:30

रखवालदारांच्या घरात गाढ झोपेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांची कुºहाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

Suspicion of atrocities on a girl in a brutal murder case near Raver | रावेरजवळील क्रूर हत्या प्रकरणी मुलीवर अत्याचाराचा संशय

रावेरजवळील क्रूर हत्या प्रकरणी मुलीवर अत्याचाराचा संशय

Next
ठळक मुद्देरखवालदार पालक बाहेरगावी गेलेले असताना घडली घटनासात संशयित ताब्यात तिघांवर संशयतिघा संशयितांची कसून चौकशी

किरण चौधरी
रावेर (जि.जळगाव) : शहरानजिक असलेल्या केळी बागेत रखवालदारांच्या घरात गाढ झोपेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांची कुºहाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सविता (वय १४) , राहुल (वय ११), अनिल (वय ८ वर्षे) व सुमन उर्फ नाणी (वय ५ वर्षे)अशी या मुलांची नावे आहेत. एका मुलीचा मृतदेह अर्धनग्ग अवस्थेत आढळून आल्याने अत्याचाराचा संशय आहे. दरम्यान, सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बोरखेडा रस्त्यावरील केळीबागेत रखवालदार महेताब गुलाबसिंग भिलाला याचे घर आहे. महेताब हा पत्नी व थोरल्या मुलासह मूळ गावी गढी (ता.भगवानपुरा, जि.खरगोन) येथील चुलत भावाच्या नातवाच्या दशक्रिया विधीसाठी मोटारसायकलीने गेला होता. चार मुले घरीच थांबली होती.
शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या शेतमालक शेख मुस्तफा शेख यासीन (रा.मण्यारवाडा, रावेर) शेतात आले असता त्यांनी रखवालदाराच्या घरात डोकावून पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिले. घरात खाटेवर एकट्या झोपलेल्या १४ वर्षीय मुलीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हे क्रूर कृत्य झाले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.
भारतीय पोलीस सेवेतील सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली चार पोलीस निरीक्षक समाविष्ट असलेल्या विशेष पोलीस पथकाकडे तपास सोपविण्यात आला आहे. पोलीस पथक व जंजीर श्वानपथक तपासाला सुरुवात केली. जंजीर ने रावेर रोडवरील भंगारवाल्यांच्या निवासस्थानापर्यंत माग दाखवला आहे.
हत्याकांडातील चौघा मृतदेहांचे लैंगिक अत्याचाराच्या संशयामुळे न्यायवैद्यकशास्त्र तथा वैद्यकीय दृष्ट्या पारदर्शकपणे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, महेताबचा मोठा मुलगा संजय याच्या सांगण्यावरून त्याचे काही मित्र रात्री घटनास्थळी जाऊन आल्याची माहिती मिळाल्याने सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील तिघांवर संशय असून, पोलीस उशिरापर्यंत त्यांची चौकशी करीत होते.

Web Title: Suspicion of atrocities on a girl in a brutal murder case near Raver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.