शालेय पोषण आहाराच्या चोरीचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:58 PM2020-04-10T21:58:41+5:302020-04-10T22:00:43+5:30

रिंगणगाव येथे रे.ना. पाटील माध्यमिक विद्यालयात शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरून नेत असल्याचा संशय आल्यावरून ग्रामस्थांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार गटशिक्षणाधिकारी तथा अधीक्षक शालेय पोषण आहार विश्वास पाटील यांच्याकडे शुक्रवारी सकाळी केली.

Suspected of theft of school nutrition | शालेय पोषण आहाराच्या चोरीचा संशय

शालेय पोषण आहाराच्या चोरीचा संशय

Next
ठळक मुद्देरिंगणगाव येथील प्रकारमुख्याध्यापकासह इतरांवर कारवाईची मागणी

एरंडोल : तालुक्यातील रिंगणगाव येथे रे.ना. पाटील माध्यमिक विद्यालयात शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरून नेत असल्याचा संशय आल्यावरून ग्रामस्थांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार गटशिक्षणाधिकारी तथा अधीक्षक शालेय पोषण आहार विश्वास पाटील यांच्याकडे शुक्रवारी सकाळी केली.
मुख्याध्यापक शरद सोनवणे, उपशिक्षक प्रशांत अहिरे व लिपिक मेघराज महाजन यांनी तांदळाच्या दोन गोणी मारुती कारमध्ये टाकताना विशाल महाले, अतुल सुरणे, शरद शिंदे या युवकांनी प्रत्यक्ष पाहिल्याची लेखी तक्रार केली आहे.
संस्थाचालकांनी शुक्रवारी तातडीची सभा घेऊन याप्रकरणी शालेय पोषण आहार यंत्रणेने चौकशी करावी, असा ठराव संमत केला. गटशिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार यंत्रणेचे अधीक्षक विश्वास पाटील यांनी प्रत्यक्ष रिंगणगाव येथे संबंधित शाळेत जाऊन चौकशी केली असता आम्ही तांदळाची एक गोणी कारमध्ये टाकली व दुसरी गोणी टाकत होतो, अशी कबुली त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, तांदळाच्या दोन्ही गोण्या परत शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या खोलीत ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले.

Web Title: Suspected of theft of school nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.