‘गोर्इंग टू लाँग जर्नी’ स्टेटस ठेवत केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:50 PM2020-07-09T17:50:54+5:302020-07-09T17:53:28+5:30

पहूरला युवकाने घेतला गळफास: कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही, गावात हळहळ

Suicide with 'Going to Long Journey' status | ‘गोर्इंग टू लाँग जर्नी’ स्टेटस ठेवत केली आत्महत्या

‘गोर्इंग टू लाँग जर्नी’ स्टेटस ठेवत केली आत्महत्या

Next

पहूर, ता. जामनेर : पेठ मधील रहिवासी राहूल समाधान चौधरी (२०) या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्घटना गुरवारी सकाळी घडली आहे. विशेष म्हणजे आत्महत्ये पूर्वी त्याने ‘गोर्इंग टू लाँग जर्नी’ असे स्टेटस  त्याच्या मोबाईलवर ठेवले होते.
या घटनेमागील कारण समजू शकले नसून ही घटना घडली त्यादरम्यान घरात त्याचे वडील समाधान पाटील व लहान भाऊ समोरील खोलीत टि.व्ही पहात होते. आई शेतात गेली होती.
यादरम्यान राहूलने आजीकडे सुपारी खाण्याची इच्छा व्यक्त केली. आजी सुपारी घेण्यासाठी बाहेर गेल्या. त्यावेळेत मागील खोलीत जावून राहूलने गळफास लावून आत्महत्या केली. याचा आवाज समोरच्या खोलीत बसलेल्या वडिलांना व भावाला आला. लगेच ते धावत आले. ते दृष्य पाहून घटनास्थळी आराडाओरड झाल्याने आजुबाजूचे लोकही जमले.
लगेचच संजय पाटील, समाधान चौधरी ,लहान भाऊ व रहिवाशांनी ग्रामीण रुग्णालयात राहूलला दाखल केले. मात्र वेळ निघून गेली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केल्याने वडील ,आजी लहान भाऊ यांनी हंबरडा फोडला.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला.
दरम्यान या युवकाने आत्महत्या का केली असावी? हे गुढ असून याप्रकारणी प्रकाश शेनफडू पांढरे यांच्या फिर्यादीवरुन पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेपूर्वी मोबाईलवर ठेवला स्टेटस
राहूलने आत्महत्या करण्याच्या पंधरा ते विस मिनिटांपूर्वी ‘गोइंग टू लाँग जर्नी’ असे स्टेटस ठेवल्याचे मित्रांनी रुग्णालयात सांगितले. राहूल सोज्वळ, शांत व गुणी मुलगा असल्याचे सांगितले. अवघ्या पंधरा मिनिटात होत्याचे नव्हते झाले. आणि राहूल अगदी दूरच्या प्रवासाला निघून गेला. काही वेळात घटनेची वार्ता गावात पसरली. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Suicide with 'Going to Long Journey' status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.