‘आनंद तरंग’मधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 03:16 PM2020-01-20T15:16:11+5:302020-01-20T15:16:48+5:30

विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम व संघर्षाला तोंड देण्याची इच्छा दाखवली तर ते त्यांच्या आयुष्यात निश्चितच यशस्वी होतात, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा.दीपक पाटील यांनी बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात वार्षिक पारितोषिक वितरणप्र्रसंगी केले.

Students' social awareness through 'Anand Tarang' | ‘आनंद तरंग’मधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधन

‘आनंद तरंग’मधून विद्यार्थ्यांनी केले समाजप्रबोधन

Next
ठळक मुद्देधरणगाव येथे रंगारंग कार्यक्रमबालकवी-कुडे विद्यालयाचा वर्धापन दिन सोहळा

धरणगाव, जि.जळगाव : विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम व संघर्षाला तोंड देण्याची इच्छा दाखवली तर ते त्यांच्या आयुष्यात निश्चितच यशस्वी होतात, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा.दीपक पाटील यांनी बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात वार्षिक पारितोषिक वितरणप्र्रसंगी केले. दुसऱ्या दिवशी झालेल्या आनंद तरंग या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.
यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष हेमलाल भाटिया, उपाध्यक्ष अंकुश पाटील, सचिव प्रा.रमेश महाजन, संचालक घनश्यामसिह बयस, रघुनाथ चौधरी, अ‍ॅड.राजेंद्र येवले, सुशीलभाई गुजराथी, शांताराम महाजन, ललित उपासनी, शोभा चौधरी, प्राथमिकचे मुख्याध्यापक विक्रमादित्य पाटील, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील, ह.भ.प.भगीरथ चिंधू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
सचिव प्रा. रमेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी दहावीत प्रथम आलेली सृष्टी सतीश महाजन या विद्यार्थिनीसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी भूषण बाळासाहेब चौधरी याची आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा तसेच चारुदत्त पाटील याची जपान येथे निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी ए.पी. बाविस्कर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष सोनवणे, उपाध्यक्षा सुरेखा सचिन पतपेढीचे संचालक रवींद्र पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
आनंद तरंग या कार्यक्रमाचे उद्घाटन सपोनि गणेश आहिरे व सहाय्यक गुंजाळ यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता पहिलीपासून ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी धार्मिक, देशभक्तीसह विविध गिते सादर केली.
दोन दिवसीय कार्यक्रमात सकाळ सत्रात ए.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार अ‍ॅड.राजेंद्र येवले यांनी मानले. प्रमुख के. जे. पवार यांनी बक्षिसांचे वाचन केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख परमेश्वर रोकडे केले. सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीचे सदस्य ए.एच.पाटील, के.के.चव्हाण, तृप्ती पाटील, पल्लवी मोरे, स्वाती येवले समितीतील प्रमुख सहाय्यक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Students' social awareness through 'Anand Tarang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.