खडसेंच्या पक्षीय सीमोल्लंघनानंतर मुक्ताईनगरात जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 02:27 PM2020-10-25T14:27:03+5:302020-10-25T14:28:09+5:30

मुक्ताईनगर : अखेर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करून माजी मंत्री एकनाथ खडसे दसऱ्याच्या दिवशी रविवारी मुक्ताईनगरला पोहोचले. राष्ट्रवादी ...

Strong welcome in Muktainagar after Khadse's partisan sea breach | खडसेंच्या पक्षीय सीमोल्लंघनानंतर मुक्ताईनगरात जोरदार स्वागत

खडसेंच्या पक्षीय सीमोल्लंघनानंतर मुक्ताईनगरात जोरदार स्वागत

Next


मुक्ताईनगर : अखेर भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करून माजी मंत्री एकनाथ खडसे दसऱ्याच्या दिवशी रविवारी मुक्ताईनगरला पोहोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नाथाभाऊ समर्थकांनी शहरात खडसेंचे जोरदार स्वागत केले.

शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुका अध्यक्ष यु.डी.पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ईश्वर राहणे, शाहिदखान, कल्याण पाटील, पं.स.चे माजी सदस्य किशोर चौधरी, साहेबराव सिंगतकर, विजय सोनार, प्रवीण पाटील, आदींनी एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे स्वागत केले.
याप्रसंगी खडसे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईहून अनेक कार्यकर्ते वाहनांनी खडसेंसोबतच शहरात दाखल झाले. कोथळी येथे मुक्ताई दर्शनानंतर खडसे मुक्ताईनगरात दाखल झाले.

दुपारी एकच्या सुमारास खडसेंच्या गाड्यांच्या ताफ्याने प्रवेश शहरात प्रवेश करताच फटाक्यांच्या आतशबाजीने जोरदार स्वागत झाले. शहरात ठिकठिकाणी आतषबाजी करून खडसें स्वागत वेगवेळ्या पदाधिकारी व संघटनांनी केला ढोलताशे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा पदाधिकारी कार्यकर्ते करीत होते. तत्पूर्वी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, रवींद्र पाटील व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवर्तन चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याना पुष्पार्पण केले.

Web Title: Strong welcome in Muktainagar after Khadse's partisan sea breach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.