तर...१४ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:45 PM2020-11-28T18:45:16+5:302020-11-28T18:45:50+5:30

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालय व परिसंस्थामधील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील निकाल जाहीर झालेल्या ...

So ... you can apply for the exam till 14th December with late fee | तर...१४ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज करता येणार

तर...१४ डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज करता येणार

Next

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालय व परिसंस्थामधील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील निकाल जाहीर झालेल्या अभ्यासक्रम/वर्गांचे डिसेंबर, २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
            संलग्नीत महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्थेततील एम.कॉम. (सत्र १ ते ४) सीजीपीए नवीन व जुने रिपीटर, एम.कॉम. (भाग १ व २) वार्षिक अभ्यासक्रम रिपिटर, बी.बी.ए. प्रथमवर्ष इंटिग्रेटेड कोर्स रिपिटर, एम.बी.ए. (सत्र१ ते ४), एम.बी.ए. (सत्र ७ ते ९) (इंटिग्रेटेढ) एम.बी.एम. (एम.पी.एम.), एम.बी.एम.(एम.सी.एम.) (सीजीपीए) सर्व (सत्र १ ते ४) जुन्या अभ्यासक्रमासहीत, एम.एम.एस. (एम.सी.एम.), एम.एम.एस. (एम.पी.एम.) (सत्र १ ते ४ नवीन) सर्व रिपिटर, एम.बी.ए. इंटिग्रेटेड (सत्र १० फक्त) रिपिटर  विद्यार्थ्यांसाठी विना विलंब शुल्क परीक्षा अर्ज सादर करण्यासाठीचा अंतिम दि.१० डिसेंबर, २०२० असून दि. १४ डिसेंबर, २०२० पर्यंत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करता येतील. महाविद्यालयांनी दि.१२ डिसेंबर, २०२० पर्यंत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज इनवर्ड करावेत तर विद्यापीठ कार्यालयात दि.१६ डिसेंबर, २०२० पर्यंत हे अर्ज जमा करावेत.  

बी.बी.एम.(बी.बी.एस.) बी.बी.ए. (सत्र १ ते ६ जुना) रिपिटर, बी.एम.एस.(बी.बी.एम.) / बी.बी.ए. (सत्र १ ते ६ नवीन) रिपपिटर विद्यार्थ्यांसाठी विना विलंब शुल्क परीक्षा अर्ज सादर करण्यासाठीचा अंतिम दि.१ डिसेंबर, २०२० असुन विलंब शुल्कासह दि.३ डिसेंबर,२०२० पर्यंत अर्ज सादर करता येतील. महाविद्यालयांनी दि.२ डिसेंबर, २०२० पर्यंत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज इनवर्ड करावेत तर विद्यापीठ कार्यालयात दि.४ डिसेंबर, २०२० पर्यंत हे अर्ज जमा करावेत. ऑनलाईन परीक्षा अर्ज व ऑनलाईन शुल्क भरणेसाठी Digital University Portal [http://nmuj.digitalunkversity.ac] वर उपलब्ध असलेल्या Online Examination Form Submission  या सुविधेद्वारे वापर करावा, असे आवाहन  परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी केले आहे.

Web Title: So ... you can apply for the exam till 14th December with late fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.