चाळीसगाव येथील सहा संशयीत जळगावी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 08:57 PM2020-04-09T20:57:36+5:302020-04-09T20:57:42+5:30

खळबळ : मालेगावच्या कोरोनाग्रस्ताच्या आले होते संपर्कत

Six suspects left for Jalgavi at Chalisgaon | चाळीसगाव येथील सहा संशयीत जळगावी रवाना

चाळीसगाव येथील सहा संशयीत जळगावी रवाना

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव: मालेगाव येथे कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेसाठी चाळीसगावातील एक जण गेला होता. तसेच मृत्यूपूर्वी देखील तो त्याला भेटण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबातील ५ जण व रिक्षाचालक अशा ६ जणांना चाळीसगाव पोलिसांनी खबदारीसाठी गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले असून त्यांना तात्काळ तपासणीसाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.बी.पी. बाविस्कर यांनी दिली.
चाळीसगाव शहरात राहणारे एका परिवाराचे नातलग मालेगाव येथे राहतात. मालेगाव येथे पाच कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका ५७ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला होता. चाळीसगावातील या परिवाराचे कोरोनाग्रस्त मयताशी जवळचे संबंध होते.
मात्र सोशल मीडियावर मालेगावच्या घटनेबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. याबाबत खरी वस्तुस्थिती नातेवाईकांनी दिली. त्यांनी सांगितले की, चाळीसगांव शहरातील हुडको कॉलनीतील ३२ वर्षीय इसम हा ८ रोजी सकाळी आठ वाजता मोटारसायकलने त्याच्या नातेवाईकाच्या दफनविधी साठी गेला होता व तो ९ रोजी तो चाळीसगावी परत आला होता. दफनविधी झाल्यानंतर ९ रोजी त्या मालेगावच्या मयत व्यक्तीचा मेडीकल रिपोर्ट ‘कोरोना’ पॅझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या चाळीसगाव येथील त्या व्यक्तीची तपासणी करा, अशी माहिती मालेगाव येथील तहसीलदार यांनी चाळीसगाव येथे कळविली. त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलिसांनी हुडको कॉलनीतील त्या व्यक्तीला व त्याच्या घरातील ४ असे एकूण पाच जणांना रिक्षामधून ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले.
त्यानंतर त्या पाच व त्यांच्या संपर्कात आलेला रिक्षाचालक असे एकूण सहा जणांना पुढील तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.
चाळीसगांव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केल्यानंतर, त्यांना पुढील तपासणीसाठी तत्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. येथे त्यांच्या कोरोना विषाणू संबंधी तपासणी केली जाणार आहे. त्याचा कोरोना विषाणू संबंधीत तपासणीचा अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी दिली आहे.
पोलिसांनी घेतले होते ताब्यात
चाळीसगाव पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेताच मुख्याधिकारी तथा तहसिलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव नगरपषिदेच्या वतीने सदर सोसायटीत रहिवास असलेल्या संपूर्ण घराला व परिसरात फवारणी करुन निर्जुंतुकीकरण केले आहे. याप्रसंगी न.पा.चे आधिकारी संजय गोयर व कर्मचारी उपस्थित होते.
आमदारांचे आवाहन
मालेगाव येथील कोरोनाबाधिताच्या दफनविधीला गेलेल्या चाळीसगावच्या संशयितांविषयी आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ प्रशासनाकडून आढावा घेतला. परिसर निर्जंतुकीकरण करण्याच्या सुचनाही दिल्या. ६ संशयितांना चाळीसगाव येथून जळगावला हलवण्यात आल्यानंतर आमदार चव्हाण यांनी नागरिकांना घराबाहेर पडू नका. असे कळकळीचे आवाहन केले आहे.

Web Title: Six suspects left for Jalgavi at Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.