एकाच दिवसात चांदीच्या भावात दीड हजार रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:15 AM2019-07-24T01:15:14+5:302019-07-24T01:15:47+5:30

महिनाभरात ३००० रुपयांनी वाढ

Silver prices rise by one and a half thousand rupees in one day | एकाच दिवसात चांदीच्या भावात दीड हजार रुपयांनी वाढ

एकाच दिवसात चांदीच्या भावात दीड हजार रुपयांनी वाढ

Next

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्कर सक्रीय झाल्याने व चीन सोबतच्या व्यापार युद्धाच्या मुद्यावरून चांदीच्या भावात एकाच दिवसात तब्बल दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागणी नसताना ही वाढ झाली असून यामुळे सराफ व्यावसायिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चांदीचे भाव वाढले असले तरी सोन्याच्या भावात मात्र १०० रुपये प्रती तोळ््याने घसरण झाली आहे.
सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भावाचाही मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीची तस्करी वाढून त्यांच्या भावात कृत्रिम वाढ होत आहे.
यात भरात भर म्हणजे अनेक देशांनी चीनकडून साहित्य खरेदी न करण्याची तयारी सुरू केल्याने एक प्रकारे चीन सोबत व्यापार युद्धच सुरू झाले आहे. त्यामुळे ब्राझील, स्पेन, जर्मनी, लंडन, येथून येणाऱ्या चांदीच्या भावावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीचे भाव वधारले. त्यामुळे भारतातही हे भाव वाढले आहेत.
महिनाभरात चांदी तीन हजार रुपयांनी वाढली
आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्कर सक्रीय झाल्याने १९ जून रोजी सोन्यासह चांदीच्याही भावत मोठी वाढ झाली होती. त्या दिवशी चांदी ५०० रुपये प्रती किलोने वाढली व ती ३८ हजार ५०० रुपयांवरून ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली होती. त्यानंतर ५ जुलै रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती किलो चांदीचे भाव झाले. ११ जुलै रोजी चांदीने ४० हजार रुपये प्रती किलोचा टप्पा गाठला. तेव्हापासून १७ जुलैचा अपवाद (३९ हजार ५०० रुपये प्रती किलो) चांदी ४० हजार रुपयांवर होती. त्यानंतर २३ जुलै रोजी एकाच दिवसात थेट दीड हजार रुपये प्रती किलोने वाढ होऊन चांदी ४१ हजार ५००रुपयांवर पोहचली.
सोन्याच्या भावात घसरण
तस्करांच्या सक्रीयतेमुळे या वेळी चांदीचे भाव वाढले असले तरी सोन्याच्या भावात मात्र १०० प्रती तोळ््याने घरसण होऊन ते ३५ हजार २०० रुपयांवरून ३५ हजार १०० रुपयांवर आले आहे.
मागणी नसताना चांदीचीभाववाढ
एरव्ही दरवर्षी जुलै, आॅगस्ट महिन्यात सोने-चांदीचे भाव कमी होतात. मात्र या वेळी जुलै महिन्यात चांदीचे भाव मागणी नसताना वधारले आहे.
चीनसोबतच्या व्यापार युद्धामुळे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे चांदीचे भाव वधारले आहे. त्यामुळे भारतातही हे भाव वाढले आहेत.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Silver prices rise by one and a half thousand rupees in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव