एकाच दिवसात चांदीत ३५०० रुपयांनी घसरण; ‘कोरोना’मुळे अस्थिरता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 05:19 AM2020-03-15T05:19:42+5:302020-03-15T06:41:24+5:30

शनिवारी तर एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल साडे तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४५ हजार ५०० रुपयांवरून ४२ हजार रुपये प्रती किलोवर आली.

Silver falls by Rs 3500 in one day; Volatility due to 'corona' | एकाच दिवसात चांदीत ३५०० रुपयांनी घसरण; ‘कोरोना’मुळे अस्थिरता

एकाच दिवसात चांदीत ३५०० रुपयांनी घसरण; ‘कोरोना’मुळे अस्थिरता

Next

- विजयकुमार सैतवाल
जळगाव - कोरोना व्हायरसची व्याप्ती वाढण्यासह सराफ बाजारावरही त्याचा परिणाम वाढतच आहे. औद्योगिक आयात-निर्यात थांबून सोने-चांदीच्या भावात दररोज घसरण होत आहे. यात शनिवारी तर एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल साडे तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४५ हजार ५०० रुपयांवरून ४२ हजार रुपये प्रती किलोवर आली. तर सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४२ हजार २०० रुपयांवरून ४१ हजार ६०० रुपये प्रती तोळ््यावर आले.

गेल्या तीन दिवसात सोने २८०० रुपये प्रती तोळा तर चांदी साडे पाच हजार रुपये प्रती किलोने घसरली आहे. कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीची औद्योगिक मागणी घटल्याने त्यांचे भाव कमी-कमी होत आहे. अमेरिका, इंग्लंडमधून आयात होणाऱ्या या धातूंच्या भावावर वेगवेगळ््या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा नेहमी प्रभाव जाणवतो. त्यात आता तर चीनमधून जगभर हातपाय पसरवित असलेल्या कोरोनाने इंधन, शेअर बाजार यांच्यावर मोठा परिणाम होत आहे. त्यातून विदेशातून येणारे सोने-चांदीदेखील सुटत नसल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरच या धातूंची मागणी घटल्याने  अमेरिका व इंग्लंडमधून सोने-चांदी निर्यात होणे व इतर देशात त्यांची आयात होण्याचे प्रमाण कमी-कमी होत आहे. परिणामी मागणी घटल्याने त्यांचे भाव कमी होत आहे.
सर्वात मोठी घसरण
हे भाव कमी होत असताना शनिवार, १४ मार्च रोजी तर चांदीच्या भावात सर्वात मोठी घसरण झाली. १३ मार्च रोजी ४५ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात थेट ३५०० रुपयांनी घसरण होऊन ती थेट ४२ हजार रुपये प्रती किलोवर आली. या पूर्वी २९ फेब्रुवारी रोजी चांदीत २५०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर तिचे भाव कमी-कमी होत गेले व आता शनिवारी ऐतिहासिक घसरण झाली. अशाच प्रकारे सोन्याच्या भावातही शनिवारी ६०० रुपये प्रती तोळ््याने घसरण झाली. गेल्या तीन दिवसांची स्थिती पाहिली तर सोने २८०० रुपये प्रती तोळा तर चांदी साडे पाच हजार रुपये प्रती किलोने घसरली आहे.

जागतिक पातळीवर सोने-चांदीची औद्योगिक आयात-निर्यात थांबून भाव कमी-कमी होत आहे. - अजयकुमार ललवाणी,
अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.

Web Title: Silver falls by Rs 3500 in one day; Volatility due to 'corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.