पारोळ : रिक्षात आलेला बेडूक बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात चालकाचा रिक्षावरील ताबा सुटून अपघात झाला. ही घटना अंबाडी शिरसाड मार्गावरील उसगाव येथे घडली तर, दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन रिक्षाचालकांसह पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
रिक्षामध्ये बेडूक असल्याने महिला प्रवासी घाबरल्या. त्यामुळे चालक बेडूक बाहेर फेकताना प्रवासाच्या अंगावर पडला. यामुळे महिला घाबरून रिक्षात गोंधळ निर्माण झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.
दोन्ही रिक्षा पलटल्या
थडकेमुळे दोन्ही रिक्षा रस्त्यातच पलटी झाल्या. त्यामुळे दोन्ही रिक्षाचालकांसह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वसई येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात या दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.