धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 06:30 IST2025-12-09T06:29:20+5:302025-12-09T06:30:05+5:30

रिक्षामध्ये बेडूक असल्याने महिला प्रवासी घाबरल्या. त्यामुळे चालक बेडूक बाहेर फेकताना प्रवासाच्या अंगावर पडला. यामुळे महिला घाबरून रिक्षात गोंधळ निर्माण झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

Shocking! A frog caused an accident involving 2 rickshaws; Five injured including the driver; What exactly happened? | धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?

धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?

पारोळ : रिक्षात आलेला बेडूक बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात चालकाचा रिक्षावरील ताबा सुटून अपघात झाला. ही घटना अंबाडी शिरसाड मार्गावरील उसगाव येथे घडली तर, दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन रिक्षाचालकांसह पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

रिक्षामध्ये बेडूक असल्याने महिला प्रवासी घाबरल्या. त्यामुळे चालक बेडूक बाहेर फेकताना प्रवासाच्या अंगावर पडला. यामुळे महिला घाबरून रिक्षात गोंधळ निर्माण झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

दोन्ही रिक्षा पलटल्या

थडकेमुळे दोन्ही रिक्षा रस्त्यातच पलटी झाल्या. त्यामुळे दोन्ही रिक्षाचालकांसह सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वसई येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात या दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Shocking! A frog caused an accident involving 2 rickshaws; Five injured including the driver; What exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात