जळगावात टागोर नगर व व्यंकटेश कॉलनीत शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:54 PM2020-06-23T12:54:17+5:302020-06-23T12:55:17+5:30

तीन कोरोना बाधितांचा मृत्यू

Shirkav in Tagore Nagar and Venkatesh Colony in Jalgaon | जळगावात टागोर नगर व व्यंकटेश कॉलनीत शिरकाव

जळगावात टागोर नगर व व्यंकटेश कॉलनीत शिरकाव

Next

जळगाव : शहरातील नवनवीन भागात रोज कोरोनाची एन्ट्री होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे़ सोमवारी शहरातील कन्टेनमेंट झोन वगळता टागोर नगर व व्यंकटेश कॉलनी या दोन भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे़ सोमवारी शासकीय पातळीवर २२ रुग्णांची नोंद करण्यात आली असून यातील १७ रुग्णांचा रहिवासाची माहिती रात्री समोर आलेली होती़
शहरातील रुग्णसंख्या काहीच दिवसात अगदीच झपाट्याने वाढून ४६४ वर पोहोचली आहे़ दरम्यान, काही परिसरात आता रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे़ एलआयसी कॉलनीत दोन दिवसांपूर्वी पहिला रुग्ण आढळून आला होता़ याच परिसरात सोमवारी ४ बाधित रुग्ण आढळले आहेत़ यासह मेहरूणमध्ये संसर्ग थांबत नसून रोज रुग्ण सापडत असल्याने या परिसरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे़ प्रतिबंधित क्षेत्रात अनेक दिवसानंतर रुग्ण आढळून येत असल्याने चाचण्या वाढवण्याची मागणी होत आहे़ सोमवार हा जिल्ह्यातील ७ तालुक्यांसाठी दिलासादायक ठरला़ भुसावळला प्रथमच एका दिवसात एकही रुग्ण आढळून आलेला नाही़ पाचोरा, यावल, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यात सोमवारी एकही रुग्ण बाधित आढळलेला नाही़ तर २६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़
शिरसोलीत तीन, नशिराबादला एक
शिरसोली/ नशिराबाद : जळगाव तालुक्यात दिवसागणीक कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. शिरसोली येथे तीन रुग्ण आढळून आले तर नशिराबाद येथील चौपाल मोहल्ला परिसरातील चाँदवाडा भागात सोमवारी एका तरूणाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री यांनी दिली. आतापर्यंत कोरोना बाधीतांची संख्या १३वर पोहचली आहे तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
निगेटीव्ह अहवाल वाढले
गेल्या दोन दिवसात निगेटीव्ह अहवालांची संख्या वाढलेली असून काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे़ रविवारी ५५६ तर सोमवारी २०४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत़ दरम्यान, प्रलंबित अहवाल ३५८ असून सोमवारी ४९१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़
जिल्ह्यात एका दिवसात ८१ रुग्ण आढळले
जिल्ह्यात कोरोनाचे ८१ बाधित आढळून आलेले आहेत़ यात जळगाव शहर २०, शिरसोली ३, नशिराबाद १, अमळनेर २, चोपडा, भडगाव येथे प्रत्येकी १, धरणगाव ७, जामनरे १५, रावेर १०, बोदवड २० असे रुग्ण आढळून आले आहेत़
२२ वर्षीय तरूणीसह ७ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यात सोमवारी ७ बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ यात रावेर तालुक्यातील २२ वर्षीय महिला, जळगाव शहरातील ५२ वर्षीय महिला, ६५ वर्षीय तसेच ६० वर्षीय वृद्ध यासह धरणगाव, चोपडा, पाचोरा येथील बाधितांचा मृत्यू झाला आहे़ यात जळगाव शहरातील दोन मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मृत्यू हा गणपती रुग्णालयात झाला आहे़ २२ वर्षीय महिलेला अ‍ॅनेमियाचा आजार होता़ ही महिला १६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाली होती़ २१ रोजी दुपारी सव्वा दोन वाजता या महिलेचा मृत्यू झाला़

Web Title: Shirkav in Tagore Nagar and Venkatesh Colony in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव