शिवसेनेची स्वबळाची तयारी: खान्देशातील २० जागांसाठी ४२ जणांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:21 PM2019-09-19T12:21:27+5:302019-09-19T12:21:51+5:30

जळगाव- ३०, धुळे- ८ आणि नंदुरबार -४ जणांचा समावेश

Self-preparation of Shiv Sena: Interview of 3 persons for 5 seats in Khandesh | शिवसेनेची स्वबळाची तयारी: खान्देशातील २० जागांसाठी ४२ जणांच्या मुलाखती

शिवसेनेची स्वबळाची तयारी: खान्देशातील २० जागांसाठी ४२ जणांच्या मुलाखती

Next

जळगाव/धुळे/नंदुरबार : खान्देशातील २० जागांसाठी शिवसेनेकडून ४२ इच्छूकांचा मुलाखती बुधवारी मुंबईच्या शिवसेना भवन येथे घेण्यात आल्या. जिल्ह्यातील ११ जागांसाठी एकूण ३० जणांनी, धुळे जिल्ह्यातील पाच जागांसाठी ८ आणि नंदुरबार येथील चार जागांसाठी ४ जणांनी मुलाखती दिल्या. रावेर मतदारसंघासाठी सर्वात जास्त १० जणांनी मुलाखती दिल्या.
मंगळवारपासून उत्तर महाराष्टÑातील ४७ जागांसाठी मुलाखतींना सुरुवात झाली असून, मंगळवारी चाळीसगावसाठी मुलाखती झाल्या होत्या. उर्वरित १० जागांसाठी बुधवारी मुलाखती झाल्या. खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख संजय सावंत, रवींद्र मिर्लेकर आदींनी या मुलाखती घेतल्या. जळगाव ग्रामीणसाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, एरंडोलसाठी माजी आमदार चिमणराव पाटील व पाचोऱ्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी मुलाखती दिल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
पाटील यांनी दिली नाही मुलाखत
अमळनेरमधून राष्टÑवादीचे पदाधिकारी अनिल पाटील यांनी मुलाखत दिली नाही. दरम्यान, ते या जागेसाठी इच्छूक असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला. तसेच त्यांचे नाव वरिष्ठांना कळविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. अमळनेरसाठी भैय्या साळूंखे, वजय पाटील व नगरसेवक संजय पाटील यांनी मुलाखती दिल्या.
चोपड्यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे त्यांच्या पत्नी लता सोनवणे व बंधू श्यामकांत सोनवणे तसेच डी.पी.साळूंखे यांनी मुलाखत दिली.
नंदुरबारसाठी चौघांच्या मुलाखती
नंदुरबार : शिवसेनेतर्फे चारही मतदार संघातील प्रत्येकी एका इच्छुकाने मुंबई येथे मुलाखत दिली. नंदुरबार मतदार संघासाठी मालती वळवी, शहादा-तळोद्यासाठी मतदारसंघासाठी रिना पाडवी आणि अक्कलकुवा मतदारसंघासाठी आमशा पाडवी यांनी मुलाखत दिली. नवापूर मतदारसंघासाठी देखील एकजण इच्छूक आहे. दरम्यान, पक्षाकडे आणखी काही इच्छूक असून त्यात दिग्गजांचा समावेश आहे. परंतु युतीसंदर्भात काय निर्णय होतो यावर त्यांचा प्रवेश आणि उमेदवारी अवलंबून राहणार असल्याची माहिती शिवेसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी दिली.
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदार संघासाठी आठ जणांनी मुलाखती दिल्या. यात धुळे शहर - धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे माजी आमदार प्रा.शरद पाटील, महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, माजी महानगर प्रमुख सतीश महाले, विद्यार्थी सेनेचे पंकज गोरे आणि डॉ.सुशील महाजन यांनी मुंबईत मुलाखती दिल्यात.
धुळे ग्रामीण - मतदारसंघातून एकमेव शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी मुलाखत दिली.
शिंदखेडा - मतदारसंघातून जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे आणि पंचायत समिती सदस्य शानाभाऊ सोनवणे यांनी मुलाखत दिली आहे.
जळगाव शहरासाठी भंगाळे, महाजन इच्छूक
जळगाव शहर मतदारसंघासाठी विष्णू भंगाळे व सुनील महाजन यांनी मुलाखती दिल्या आहेत. जामनेरसाठी जि.प.चे माजी सदस्य दीपक राजपूत व ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी मुलाखत दिली आहे. भुसावळसाठी ६ जण उपस्थित होते. मुक्ताईनगरसाठी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मुलाखत दिली.

Web Title: Self-preparation of Shiv Sena: Interview of 3 persons for 5 seats in Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव