दहिवदला समृद्धी गाव स्पर्धेचे गावातच पडद्यावर प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 09:51 PM2020-10-12T21:51:31+5:302020-10-12T21:55:57+5:30

दहिवद गाव सत्यमेव जयते समृद्धी गाव स्पर्धेत सहभागी झाले आहे.

On-screen training of Dahiwadala Samrudhi Gaon competition in the village itself | दहिवदला समृद्धी गाव स्पर्धेचे गावातच पडद्यावर प्रशिक्षण

दहिवदला समृद्धी गाव स्पर्धेचे गावातच पडद्यावर प्रशिक्षण

googlenewsNext
ठळक मुद्देशेतीच्या कामातही व कोरोनाच्या भीतीतही महिलांची उपस्थितीदहिवद गाव सत्यमेव जयते समृद्धी गाव स्पर्धेत सहभागी झाले आहे

अमळनेर : तालुक्यातील दहिवद गाव सत्यमेव जयते समृद्धी गाव स्पर्धेत सहभागी झाले आहे. कोरोनामुळे गावातच महिलांना प्रोजेक्टरद्वारे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.
सुगीचे दिवस असताना, शेतीची कामे सुरू आहेत आणि कोरोनाचे संकट असताना देखील महिला पडद्यावरील प्रशिक्षणास हजर राहिल्या.
सरपंच सुषमा देसले यांनी विशेष पुढाकार घेतला. गावात अडवण्यात येणाऱ्या पाण्याचे पैशात रूपांतर करण्यासाठी महिला शक्ती व युवा शक्ती स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ग्रामीण भागात बचत गटांचे उत्पन्न वाढवणे, व्यवसायाला चालना देणे, दुग्ध व्यवसायात प्रगती करून मजुरांच्या हाताला काम देणे, गावात समृद्धी शिक्षण योजना, आरोग्य व स्वच्छ पाण्याची व्यवस्था निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याचे सरपंच सुषमा देसले यांनी प्रशिक्षणाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.




 

Web Title: On-screen training of Dahiwadala Samrudhi Gaon competition in the village itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.