अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी संग्रामसिंह सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 10:48 PM2019-11-07T22:48:46+5:302019-11-07T23:00:31+5:30

जळगाव - अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी नुकतीच जळगाव येथील संग्रामसिंह सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली ...

Sangram Singh Suryawanshi as the Nashik Divisional Youth President of the All India Kshatriya General Assembly | अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी संग्रामसिंह सूर्यवंशी

अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी संग्रामसिंह सूर्यवंशी

Next

जळगाव- अखिल भारतीय क्षत्रिय महासभाच्या नाशिक विभागीय युवा अध्यक्षपदी नुकतीच जळगाव येथील संग्रामसिंह सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत विविध विभागीय नवीन नियुक्त्या करण्यात आल्या असून येत्या ९ नोव्हेंबर रोजी शेगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय क्षत्रिय राजपुत महिलांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जाहीर पदभार देण्यात येणार आहे, अशी यमाहिती अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेंद्रसिंह राजपुत यांनी कळविली आहे.

शेगाव येथील रोकडीया नगरमधील मथुरा लॅन्स येथे सकाळी ११ वाजेच्या सुमारास अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार हरिवंश सिंह ठाकूर, उपाध्यक्ष चंदनसिंह रौतले, दमयंती रॉय चौहाण, भागवत राजपुत, पंकज राजपुत, प्रतिभा राणा, दीपक सिंह, दिलीप ठाकूर यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती असणार आहे.

शेगाव येथे होणा-या अधिवेशनाला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजेंद्रसिंह ठाकूर, जळगाव जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर राजपुत, संग्रामसिंह सूर्यवंशी, महेंद्रसिंह पाटील, स्वामी पाटील, अ‍ॅड़ स्वप्निल पाटील, बापूराव साळुंखे, नितीन पाटील आदींनी केले आहे.

Web Title: Sangram Singh Suryawanshi as the Nashik Divisional Youth President of the All India Kshatriya General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.