पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 11:59 AM2020-06-05T11:59:10+5:302020-06-05T11:59:36+5:30

शहरवासियांची वाट बिकट : चार महिने पुन्हा तीच समस्या राहणार

The roads were waiting for the first rain | पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

Next

जळगाव : गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात जळगावकरांना मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा समस्येला तोंड द्यावे लागले होते. निदान वर्षभराच्या काळानंतर ही समस्या मार्गी लागून यंदाच्या पावसाळ्यात तरी रस्त्यांची समस्या निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा जळगावकरांना होती. मात्र, पहिल्याच पावसात जळगावकरांची अपेक्षा पाण्यात गेली असून, पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यामुळे गेल्यावर्षाप्रमाणेच यंदाही जळगावकरांची वाट बिकटच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आॅगस्ट २०१८ मध्ये शहराचा वर्षभरात चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन देत मनपात सत्ता प्राप्त केलेल्या भाजपला आपल्या २२ महिन्यांच्या कार्यकाळात शहराच्या समस्या सोडविण्यास पुर्णपणे अपयश आले आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून नवीन रस्त्यांचे काम होवू शकलेले नाही. त्यातच जे रस्ते आहेत. त्याची साधी दुरुस्तीही मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांना करता आलेली नाही. गेल्यावर्षी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे शहरातील उद्योजक बोरोले यांचा चित्रा चौकात अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, ढीम्म मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी यावर्षीही रस्त्यांचा समस्येकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले असून, यंदाही मनपा प्रशासन रस्त्यांचे कामे करण्यासाठी शहरात आणखीन मृत्यूंची वाट पाहत आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मंगळवारी व बुधवारी शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची समस्या निर्माण झाली आहे. अमृत योजनेचेही काम बंद असल्याने पदाधिकाºयांना आता ‘अमृत’ च्या कामांना दोष देता येणार नाही. कारण रस्त्यांच्या मधोमध खड्डे झाले आहेत. नवसाचा गणपती मागील रस्ता, रायसोनी नगर, जिजाऊ चौक, गाडगेबाबा चौक, गणेश कॉलनी चौक, एसएमआयटी महाविद्यालय ते नवीन बजरंग बोगदा रस्ता, शिवाजीनगर, दुध फेडरेशन समोरील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आह. मात्र, मनपाकडून लॉकडाऊनचे कारण सांगत या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मनपाकडून वर्षभर रस्त्यांची समस्या मार्गी लावता येत नाही. मात्र, रस्त्यांबाबत मनपा प्रशासन व सत्ताधाºयांना घेरल्यानंतर खड्डयांमध्ये मुरूम टाकून समस्येवर पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी व मनपा प्रशासनाकडून केले जात असते.

तीच समस्या पुन्हा एकवेळ
दोन महिन्यांपासून कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच थांबून होते. मात्र,आता लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जात असून, शहरातील बाजारपेठा हळूहळू उघडण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत आता शहरातील रस्त्यांवर पुन्हा रेलचेल वाढणार आहे. मात्र, गेल्या वर्षाची रस्त्यांची समस्या जळगावकरांना भेडसावणार आहे. त्याचे ‘ट्रेलर’ पहिल्याच पावसात दिसून गेले आहे. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर रस्त्यांची पुर्णपणे वाट लागली आहे.
१०० कोटींतून एक दमडीचाही खर्च नाही
मनपात सत्ता संपादन गेल्यानंतर १६ आॅगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपाला नगरोथ्थातंर्गत १०० कोटींचा निधी जाहीर केला होता. मात्र, वर्षभर मनपातील सत्ताधारी भाजपाच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा निधी खर्च करता आला नाही. निधी जाहीर होवून २२ महिन्यांचा काळ होवून ही या निधीतून एक दमडीचाही खर्च सत्ताधाºयांना करता आलेला नाही.

Web Title: The roads were waiting for the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.