विक्री घटल्याने दुधाच्या खरेदी दरात कपात, गायीच्या दुधात ६ तर म्हैस दुधात ५ रुपयांची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:31 PM2020-03-28T12:31:49+5:302020-03-28T12:32:40+5:30

कोरोनाचा दूध उत्पादकांना फटका

Reduction in purchase price of milk due to decline in sales, reduction of cow milk by 5 and buffalo milk by Rs. | विक्री घटल्याने दुधाच्या खरेदी दरात कपात, गायीच्या दुधात ६ तर म्हैस दुधात ५ रुपयांची घट

विक्री घटल्याने दुधाच्या खरेदी दरात कपात, गायीच्या दुधात ६ तर म्हैस दुधात ५ रुपयांची घट

Next

जळगाव /दापोरा : कोरोना विषाणूचा सर्वच क्षेत्रांना फटका बसत असताना सध्या हॉटेल व इतर दुकाने बंदही असल्याने दुधाची मागणी घटल्याने व आवक कायम असल्याने जिल्हा दूध संघाकडून दूध खरेदी दरात मोठी कपात करण्यात आली. यामध्ये गायीच्या दुधात ६ रुपये तर म्हैस दुधात ५ रुपये प्रती लिटररने कपात करण्यात आली हे दर २८ मार्चपासून लागू होणार आहे. आधीच हंगामातील अतिपाऊन व सध्याच्या अवकाळी पावसामुळे संकाटत सापडलेल्या शेतकरी व पशुपालकांना कोरोनामुळेही हा मोठा फटका बसला आहे.
कोरोनामुळे मोठा फटका जिल्हा दूध संघास विक्री साठी बसत आहे. संघास सध्या ३ लाख ३५ हजार दुधाचे दररोज संकलन होत आहे. मात्र त्या प्रमाणात विक्री न होता दररोज ५० हजार लीटर दूध शिल्लक राहत आहे.
किरकोळ चहा विक्री दुकाने बंद
जिल्ह्यात सुरू असलेली संचार बंदी व लॉक डाऊनमुळे किरकोळ चहा विक्री दुकाने, रेस्टारंट बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात चहाचा खप असणारा एमआयडीसी विभागदेखील बंद असल्याने दूध विक्री कमी झाली आहे.
खाजगी व्यापाऱ्यांनी केले भाव कमी
खाजगी व्यापाऱ्यांनी गायीचे विक्री दर २० रुपये तर म्हैस दुधाचे दर ३० रुपये प्रती लिटर केले आहेत. त्यांनीदेखील शिल्लक दूध प्राथमिक संस्था मार्फत संघास दिले जात आहे.
पॉलिथीन बनविणारे फॅक्टरी बंद
कोरोनामुळे सर्वत्र कामगारवर्ग घरीच आहे. यामुळे दुधाचे बटर, पावडर पॅकिंगसाठी लागणारी पॉलिथीनच्या फॅक्टरी बंद झाल्या असून पॉलिथीन उपलब्ध नाही.
विक्री दर जैसे थे राहणार
दुधाच्या खरेदी दरात कपात करण्यात आली असली तर विक्री दर कमी होणार नसल्याचे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. कारण सध्या आवक तर कायम आहे, मात्र विक्री घटल्याने उलट संघास तोटा होत आहे. यातून सावरण्यासाठी संघाकडून दूध पावडर, बटर तयार केले जात आहे. मात्र लॉक आऊटच्या अनिश्चिततेमुळे त्याचीही विक्री वाढेल की नाही याची शाश्वती नाही, त्यामुळे दुधाचे दर कमी होणे शक्य नसल्याचे दूध संघाचे म्हणणे आहे.
नवीन दर
गाय दूध खरेदी दरात ६ रुपये घट होऊन २१० प्रति किलो घन घटक प्रमाणे ३.५ फॅट ८.५ एसएनएफ साठी २५.२० रुपये तर म्हैस खरेदी दरात ५ रुपये घट होऊन दर ६ रु प्रती फॅट प्रमाणे ६ फॅट ९ एसएनएफ साठी ३६ रु नवीन दर लागू होणार आहे.

संघास दररोज ५० हजार लिटर अतिरिक्त दूध येत असून किरकोळ विक्रीतदेखील मोठी घट झाली आहे. छोटे चहा विक्रेतेदेखील कोरोनामुळे बंद झाल्याने दुधाची विक्री कमी होत असून याचा फटका संघास बसत आहे.
-मनोज लिमये कार्यकारी संचालक
 

Web Title: Reduction in purchase price of milk due to decline in sales, reduction of cow milk by 5 and buffalo milk by Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव