रेकॉर्डिंगच्या आधारे इतिवृत्ताची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:25 PM2020-08-12T12:25:55+5:302020-08-12T12:26:09+5:30

जळगाव : कोरोनामुळे पाच महिन्यांपासून स्थगित असलेली मनपाची महासभा बुधवारी होत असून, मनपाच्या इतिहासात पहिल्यादाचं आॅनलाईन पद्धतीने महासभा ही ...

Record based on recordings | रेकॉर्डिंगच्या आधारे इतिवृत्ताची नोंद

रेकॉर्डिंगच्या आधारे इतिवृत्ताची नोंद

googlenewsNext

जळगाव : कोरोनामुळे पाच महिन्यांपासून स्थगित असलेली मनपाची महासभा बुधवारी होत असून, मनपाच्या इतिहासात पहिल्यादाचं आॅनलाईन पद्धतीने महासभा ही होत आहे. या सभेसाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली असून सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सभागहात प्रोजेक्टर ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरसचिव सुनील गोराणे यांनी दिली.
महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता या सभेला सुरूवात होणार आहे. सभागृहात महापौर भारती सोनवणे यांच्यासह उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी व नगरसचिव सुनील गोराणे बसणार आहेत. तर स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन , भाजपचे गटनेते भगत बालाणी, शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान, कैलास सोनवणे आदी पदाधिकाºयांची सतराव्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात केली जाणार आहे. दरम्यान, या सभेच्या अनुषंगाने मनपा प्रशासनातर्फे प्रभाग समिती निहाय डेमो तयार करण्यात आले असून, यामुळे नगरसेवकांना घरी बसूनही सभेत सहभागी होता येणार आहे.
आॅनलाईन सभेत सहभागी कसे व्हावे, अ‍ॅपचा उपयोग कसा करावा, याबाबत नगरसेवकांना माहिती पुस्तिकादेखील देण्यात आली आहे. आपला मुद्दा मांडायचा असेल तर त्यांना हँड राईज आॅप्शनने हात उंचवावा लागणार आहे. नगरसेवकांनी हात उंचावल्यावर संबंधित नगरसेवक महापौरांना स्पष्ट दिसण्यासाठी सभागृहात प्रोजेक्टर ठेवण्यात येणार आहे. यामुळे महापौरांना संबंधित नगरसेवकाला बोलण्याची संधी देण्यात येणार आहे. दरम्यान, आॅनलाईन सभेसाठी सर्व तयारी करण्यात आली असून, गेल्या रविवारीदेखील या सभेची पूर्व चाचणी घेण्यात आली. त्यामुळे कुठल्याही अडथळ््या विणा ही सभा पार पडणार असल्याचे गोराणी यांनी सांगितले.

पहिल्यादाचं होणाºया आॅनलाईन सभेचे संपूर्ण रेकॉडिंग केले जाणार आहे. या रेकॉर्डिंगच्या आधारे सभेच्या इतीवृत्ताची नोंद केली जाणार आहे. दरम्यान, काही सदस्यांकडून नेटवर्कच्या समस्यामुळे सभेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Record based on recordings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.