रावेर हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 06:27 AM2020-10-18T06:27:19+5:302020-10-18T06:30:23+5:30

चारही मृत भावंडांवर शनिवारी दुपारी एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आले. याप्रसंगी मयत भिलाला कुटुंबासह आप्तेष्ठांना अश्रू अनावर झाले होते. (Raver murder case)

Raver murder case in fast track court | रावेर हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

रावेर हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

Next


जळगाव : बोरखेडा ता. रावेर शिवारात चारही भावंडाच्या हत्याप्रकणात ठोस पुरावे हाती लागले आहेत. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होईल. त्यासाठी राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल,  अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे दिली. 

बोरखेडा येथे शुक्रवारी सकाळी चार भावंडांचे हत्याकांड उघडकीस आले होते. बोरखेडा शिवारात शेख मुस्तफा शेख यासीन यांच्या शेतात अज्ञात मारेकऱ्यांनी  सविता (वय १४), राहुल (वय ११), अनिल (वय ८ वर्षे) आणि सुमन उर्फ नाणी भिलाला (वय ५ वर्षे) या भावंडांची कुऱ्हाडीने हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

 शनिवारी दुपारी गृहमंत्री देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली  आणि परिवाराचे सात्वंन केले. त्यांच्यासोबत भाजप नेते एकनाथराव खडसे, आमदार शिरीष चौधरी आदी होते. चौघांपैकी तीन मुलांचे शवविच्छेदन हे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आल़े  

एकाच वेळी अंत्यसंस्कार -
चारही मृत भावंडांवर शनिवारी दुपारी एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार (दफनविधी) करण्यात आले. याप्रसंगी मयत भिलाला कुटुंबासह आप्तेष्ठांना अश्रू अनावर झाले होते.


 

Web Title: Raver murder case in fast track court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.