खडसेंच्या सुनबाई जोमात, रावेरमध्ये रक्षा खडसेंचा कॉंग्रेसच्या पाटलांना 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:54 AM2019-05-23T11:54:56+5:302019-05-23T11:56:26+5:30

Raver Lok Sabha Election Results 2019 : रावेर मतदारसंघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे विरूद्ध कोंग्रेसचे डॉ.उल्हास पाटील अशी रंगत आहे.

Raver Lok Sabha Election 2019 live result & winner: Raksha Khadse VS Ulhas Vasudeo Patil Votes & Results | खडसेंच्या सुनबाई जोमात, रावेरमध्ये रक्षा खडसेंचा कॉंग्रेसच्या पाटलांना 'दे धक्का'

खडसेंच्या सुनबाई जोमात, रावेरमध्ये रक्षा खडसेंचा कॉंग्रेसच्या पाटलांना 'दे धक्का'

Next

जळगाव -  लोकसभा निवडणुकीसा जळगाव लोकसभा मतदार संघात 56.11  तर रावेर लोकसभा मतदार संघात 61.40 टक्के मतदान झाले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्यात प्रमुख लढत असून रावेर मतदारसंघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे विरूद्ध कोंग्रेसचे डॉ.उल्हास पाटील अशी रंगत आहे. खानदेशमधील या दोन्ही मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

भाजपाच्या रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली असून जवळपास 1 लाख मतांनी आघाडी घेतली आहे. रक्षा खडसे यांना 2,11,336 मते मिळाली असून कॉग्रेसच्या डॉ.उल्हास पाटील यांना 114642 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात तिसर्‍या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे नितिन कांडेलकर राहिले असून त्यांना 30924 मते मिळाली आहेत. सकाळी 11.30 वाजेपर्यंत ही मतमोजणीची आकडेवारी आहे. रावेर लोकसभा मतदार संघात पुरुष मतदार  9,23,627, स्त्री 8,49,451, इतर 29 असे एकूण 17,73,107 मतदार आहेत. त्यापैकी मतदान केलेले  पुरुष मतदार 5,83,427, स्त्री  5,05,262, इतर 1 असे एकूण 10,88,690 मतदारांनी मतदानाचा हक्क बजविला. त्यानुसार या मतदार संघात  मतदानाची टक्केवारी पुरुष 63.17 टक्के, स्त्री 59.48 टक्के, इतर 3.45 टक्के अशी एकूण 61.40 टक्के इतकी आहे.
 

Web Title: Raver Lok Sabha Election 2019 live result & winner: Raksha Khadse VS Ulhas Vasudeo Patil Votes & Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.