समाजातील रावण जाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:00 AM2019-12-10T00:00:17+5:302019-12-10T00:00:34+5:30

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत प्रासंगिक या सदरात लिहिताहेत जळगाव येथील लेखिका प्रिया सफळे...

Ravan Net in the community | समाजातील रावण जाळा

समाजातील रावण जाळा

Next

पौराणिक, ऐतिहासिक, वैज्ञानिक, आधुनिक काळ हा स्त्रियांच्या विविध पैलूंनी, गुणांनी, कर्तृत्वाने समृद्ध झाला आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा उंच झोका आभाळाकडे झेपावतोय.
यत्र नार्यस्तु पूज्यनते रमनते तत्र देवता:।
साफ खोटं, खोटं आहे हे मनुवचन, किती, किती निरागस, निष्पाप, मुली अशा अमानुष कृत्यांचा बळी होणार आहेत? कधी होणार असे कायदे की या नराधम फासावर लगेच लटकावले जातील? घटना घडते, आपण सुन्न होतो, संताप व्यक्त करतो, गुन्हेगार सापडतात, कधी नाही सापडत, पोलीस यंत्रणा शोध घेत रहाते, मग न्याययंत्रणा सुरू होते. तारीख पे तारीख पडत रहाते. काळ पुढे जात असतो. ज्या कुटुंबावर हा आघात झाला असतो, ते वाट पहात राहतं की या नराधमांना कधी कठोर शिक्षा होईल, म्हणजे त्या कोवळ्या जीवाच्या आत्म्यास शांती मिळेल. भाबड्या आशेवर जगत रहातात. बरेच पुराव्याअभावी राजरोसपणे फिरतात, काहींना शिक्षा होते पण खूप काळ जातो.
मुलींना आईवडील सक्षम करताहेत, बुद्धिमत्तेच्या जोरावर यशोशिखरावर या लेकी विराजमान होताहेत आणि आणि समाजातले, मानवजातीला काळिमा फासणारे हे आसूर त्यांच्यावर अत्याचार करून या लेकींना कधी जाळतात. कधी तुकडे करतात, कधी दरीत फेकून देतात. का यांना आई, बहीण, पत्नी, मुलगी नाही? परिवारात स्त्रिया नाहीत की दुसऱ्यांच्या मुली कस्पटासमान आहेत?
बंद करा दरवर्षी त्या रावणाला जाळणं. समाजातील हे रावण जाळा. जे रामाचे मुखवटे घालून राजरोसपणे फिरताहेत आणि स्त्रियांवर अत्याचार करताहेत. रोजच्या बातम्या आहेत. अगदी दोन-तीन वर्षाच्या चिमुरड्यांना हे राक्षस चिरडून टाकताहेत. कधी कधी थांबणार हे दुष्टचक्र?
नोटाबंदी एका रात्रीत घडली, सर्जिकल स्ट्राईक एका रात्रीत झालं, काश्मीरमधील ३७० कलम हटवलं गेलं, तहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. १३४ वर्षे बहुचर्चित अयोध्या मंदिर-मशीद वाद संपला. असे कितीतरी प्रश्न, समस्या आपण प्रगल्भ बुद्धिमतेच्या जोरावर सोडवित आहोत. स्त्रियांना निर्भयपणे जगण्यासाठीचा कायदा लवकरात लवकर यावा. नराधमांना अशी शिक्षा सुनावली जावी की वाईट कृत्य करताना व्यक्ती विचार करेल, की त्याचा मृत्यू अटळ आहे. याचा आता न्याय व्यवस्थेने गांभिर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
-प्रिया सफळे, जळगाव

Web Title: Ravan Net in the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.