आगामी दोन दिवस पुन्हा एकदा पावसाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:20 PM2019-12-02T12:20:55+5:302019-12-02T12:21:15+5:30

किमान तापमानात वाढ : दादर, हरभऱ्याला बसु शकतो फटका ; शेतकरी वर्गाची परत वाढली चिंता

Rain forecast again for the next two days | आगामी दोन दिवस पुन्हा एकदा पावसाचा अंदाज

आगामी दोन दिवस पुन्हा एकदा पावसाचा अंदाज

Next

जळगाव : दक्षिण भारतात उत्तर-पूर्व मान्सून सक्रीय झाल्यामुळे राज्यात काही भागात आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात देखील २ ते ४ डिसेंबरदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला.
यंदा मान्सूनचा प्रवास आॅक्टोबर मध्यापर्यंत लांबल्यानंतरही नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पावसाची नोंद यंदा झाली. त्यामुळा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला. त्यात झालेल्या नुकसानावर मात करत शेतकºयांनी रब्बीसाठी तयारी सुरु केली, मात्र आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

दादरला बसू शकतो फटका
सध्या रब्बीची लागवड सुरु आहे. अनेक भागात हरभºयाची लागवड देखील झाली आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास ज्या ठिकाणी हरभºयाची लागवड झाली आहे. त्या ठिकाणी हरभºयाचे नुकसान होण्याची भिती आहे. तर दादरला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. कापूस देखील काढला जात असून, पाऊस झाल्यास कापसाचेही नुकसान होण्याची भिती आहे.

पावसाचे काय कारण... दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडूमध्ये उत्तर-पूर्व मान्सून सक्रीय झाला आहे. त्यातच अरबी व हिंदी महासागरातील लक्षव्दिप जवळ चक्रवाती क्षेत्र निर्माण झाले आहे. जोरदार वाºयांमुळे हा बाष्पयुक्त ढग महाराष्टÑाकडे सरकत आहेत. त्यामुळे राज्यासह जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पावसासह वाºयांचा वेग जोरात राहू शकतो.रविवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण पहायला मिळाले. किमान तापमानात वाढ झाली असल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. रविवारी किमान तापमान २० अंशापर्यंत वाढले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात जाणवत असलेला गारवा रविवारी कमी झाला होता.

Web Title: Rain forecast again for the next two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.