तापीपूर्णा जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती अयोध्येला नेण्यासाठी शनिवारी पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 03:32 PM2020-07-31T15:32:31+5:302020-07-31T15:32:38+5:30

तापीपूर्णा जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती अयोध्येला नेण्यासाठी शनिवारी पूजन करण्यात येणार आहे.

Pujan on Saturday to take Tapipurna Jal and soil of Sant Muktabai Samadhi to Ayodhya | तापीपूर्णा जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती अयोध्येला नेण्यासाठी शनिवारी पूजन

तापीपूर्णा जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळाची माती अयोध्येला नेण्यासाठी शनिवारी पूजन

googlenewsNext

मुक्ताईनगर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या मंदिर भूमिपूजन कार्यक्रमास अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा सतपंथ आश्रम फैजपूर येथील महामंडलेश्वर प.पू. जनार्दन हरीजी महाराज यांना उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. तापी-पूर्णा संगमावरील पवित्र जल व संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथील पवित्र माती शनिवार, १ आॅगस्ट रोजी विधीवत पूजनाने जनार्दन हरीजी महाराज यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.
याबाबत जुने मुक्ताई मंदिर व्यवस्थापक उद्धव महाराज जुणारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे चार धामपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र कोथळी (ता.मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताई समाधीस्थळाची माती जी संत मुक्ताई सातशे वर्षांपूर्वी विजेच्या रूपात अंतर्धान ज्या भूमीत झाल्या व जेथे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ-श्रेष्ठ थोर संत प.पू. जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, धोंडोपंतदादा, सद्गुरू झेंडूजी महाराज, सद्गुरू सखाराम महाराज अनेक थोर महापुरुषांनी येथील रजकण आपल्या भाळी लावून ज्या भूमीला नतमस्तक झाले अशी पवित्र माती व चांगदेव येथील तापी-पूर्णा संगमाचे पवित्र जल शनिवारी सकाळी ११ वाजता महामंडलेश्वर प.पू.जनार्दन हरीजी महाराज, श्री संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, ह.भ.प. रवींंद्र महाराज हरणे यांच्या हस्ते विधीवत पूजन करून संकलीत करण्यात येणार आहे. संपूर्ण खानदेश, विदर्भातील रामभक्तांच्या वतीने प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज संत मुक्ताबाई भूमीतील पवित्र जल व माती घेऊन अयोध्येकडे प्रस्थान करणार आहेत.

Web Title: Pujan on Saturday to take Tapipurna Jal and soil of Sant Muktabai Samadhi to Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.