गूळ खातोय भाव, पण साखरेला मागणी अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:12+5:302021-06-25T04:14:12+5:30

आहारात गुळाचा वापर वाढला, आरोग्याप्रती जागरूक झाले जळगावकर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याप्रती नागरिक जागरूक ...

The price of jaggery is high, but the demand for sugar is high | गूळ खातोय भाव, पण साखरेला मागणी अधिक

गूळ खातोय भाव, पण साखरेला मागणी अधिक

googlenewsNext

आहारात गुळाचा वापर वाढला, आरोग्याप्रती जागरूक झाले जळगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याप्रती नागरिक जागरूक झाले आहे. त्यामुळे आता गुळाचा ‘भाव’देखील वाढत आहे. असे असले तरी साखरेची मागणी अजूनही तेवढीच आहे. गुळाच्या आरोग्यदायक गुणधर्मांमुळे अनेकजण आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करीत आहेत.

साखर ही ग्लुकोज स्वरुपात शरीराला मिळते. त्यामुळे मधुमेहासह अनेक आजारांना शरीर निमंत्रण देते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये अनेकजण आपल्या आरोग्याप्रती जागरूक झाले आहेत. त्यामुळे सगळीकडे साखर वापरावी की गूळ वापरावा, यावर चर्चा होते. पूर्वीच्या काळी सर्वत्र फक्त गूळच वापरला जात होता किंवा फार तर आहारात खांडसरीचा वापर होता. मात्र, नंतरच्या काळात राज्यात अनेक साखरेचे कारखाने उभे राहिले. साखर मुबलक प्रमाणात मिळू लागली. तेव्हा गूळ हा गरिबांचा, तर साखर ही श्रीमंताची मानली गेली. हीच साखर स्वस्त किमतीत मिळू लागल्याने तिची खरेदी वाढली आणि गुळाला कुणीही विचारेनासे झाले. आता मात्र हे दिवस बदलले आहेत. अनेकांनी आपल्या आहारात गुळाचा किंवा खांडसरीच्या साखरेचा वापर सुरू केला आहे.

गुळाचा चहा बनले स्टेटस

सध्या जागोजागी चहा विक्री करणारे अनेक ब्रँड्स उभे राहिले आहेत. त्यांच्याकडे साधा साखर घातलेल्या चहापेक्षा गुळाच्या चहाची किंमत ही दुप्पट असते. एकेकाळी गुळाच्या चहाला गरिबांचा चहा म्हणून हिणविले जात होते. मात्र, अनेकजण हा गुळाचा चहा स्टेटस सिम्बॉल बनला आहे. आरोग्याबद्दल जागरूक असलेले अनेकजण हा गूळ घातलेला चहाच घेतात किंवा घरातील अन्य गोड खाद्यपदार्थांमध्ये गुळाचाच वापर केला जातो.

भाव

फेब्रुवारी

गूळ ४८

साखर ३६

मार्च

गूळ ४८

साखर ३६

एप्रिल

गूळ - ४७

साखर ३६

मे गूळ ४७

साखर ३६

जून गूळ ४४

साखर ३६

कोट : गूळ हा उष्ण आहे. त्यात फ्रुक्टोज असते, तर साखरेत ग्लुकोज असते. गूळ हा साखरेपेक्षा नक्कीच आरोग्यदायी आहे. साखरेत प्रीझर्वेटिव्ह म्हणून घातक रसायनेदेखील टाकली जातात. त्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो - डॉ. मिलिंद कांबळे, आयुर्वेद तज्ज्ञ.

कोट - ग्रामीण भागात मात्र अजूनही साखरेचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे गुळापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात साखर विकली जात आहे. गुळाचा वापर क्वचितच खाद्यपदार्थांमध्ये केला जातो - महेश वाणी, व्यापारी

कोट : गेले काही वर्षांमध्ये गुळाची विक्री वाढली असली तरी भाव स्थिर आहेत. सरकारने साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवले असल्याने त्याचे भावात फारसे बदल झालेले नाहीत. सध्या अनेक ठिकाणी साखरेऐवजी गुळाची मागणी होत आहे. - सचिन छाजेड, व्यापारी.

कोट : गुळाला अजूनही फारशी मागणी नाही. त्याऐवजी दररोज साखरच वापरली जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये गुळाला बऱ्यापैकी मागणी येत आहे. - रवी नेवे, व्यापारी.

Web Title: The price of jaggery is high, but the demand for sugar is high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.