चोपडा येथे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:20 AM2020-01-12T00:20:43+5:302020-01-12T00:22:44+5:30

शासकीय कापूस खरेदी केंद्राद्वारे कापूस खरेदी केला जात आहे. मात्र या खरेदी केंद्रावर ग्रेडर कडून शेतकऱ्यांना आर्द्रता मोजणीवरून भेदभाव केला जात असल्याचा संशय शेतकºयांना आल्याने, तसेच कापसाची आर्द्रता कापूस गाडीतून बाहेर काढल्यानंतर मोजणी झाली पाहिजे. वाहनात असताना आर्द्रता मोजू नये. या कारणावरून शेतकरी आणि कापूस खरेदी केंद्रावरील ग्रेडर शेतकºयांमध्ये राडा झाला.

Pour the cotton at the farmers' shopping center at Chopda | चोपडा येथे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर राडा

चोपडा येथे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर राडा

Next
ठळक मुद्देकापसाच्या आर्द्रता मोजण्यावरून झाला वादग्रेडरला घातला घेराव

चोपडा, जि.जळगाव : येथील गो.भि. जिनिंगमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राद्वारे कापूस खरेदी केला जात आहे. मात्र या खरेदी केंद्रावर ग्रेडर कडून शेतकऱ्यांना आर्द्रता मोजणीवरून भेदभाव केला जात असल्याचा संशय शेतकºयांना आल्याने, तसेच कापसाची आर्द्रता कापूस गाडीतून बाहेर काढल्यानंतर मोजणी झाली पाहिजे. वाहनात असताना आर्द्रता मोजू नये. या कारणावरून शेतकरी आणि कापूस खरेदी केंद्रावरील ग्रेडर शेतकºयांमध्ये राडा झाला. जवळपास हा राडा सकाळी साडेअकरा वाजेपासून तर दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होता. या काळात शेतकºयांनी गो.भि. जिनिंगमधील कापूस मोजण्यासाठीचा भुई काटा बंद केला होता.
कापसाला ग्रेड (प्रतवारी) लावताना भेदभाव केला जात असल्याचा संशयही येत असल्यामुळे कापूस विक्रीसाठी आलेल्या सर्व शेतकºयांनी संताप व्यक्त केला. तसेच हप्त्यातून केवळ शुक्रवार आणि शनिवार हे दोनच दिवस खरेदी केंद्र सुरू असते. त्यावरही शेतकºयांनी संताप व्यक्त केला. हप्ताभर कापूस खरेदी केंद्र सुरू राहावे, अशी मागणी केली. जवळपास तीन ते चार तासानंतर शेतकºयांचा राडा थांबून नंतर कापूस मोजला गेला.
दरम्यान, चोपडा येथे ९ डिसेंबरपासून ते ११ जानेवारीपर्यंत केवळ नऊच दिवस केंद्र सुरू असल्याने आतापर्यंत तीन हजार ४३६ क्विंटल कापूस खरेदी केला गेला आहे. तसेच १० जानेवारी रोजी मात्र आर्द्रता मोजणारे मोबाइल मास्टर मीटर खराब असल्याने त्या दिवशी जवळपास ९७३ क्विंटल ६० किलो कापूस बिना आर्द्रता मोजण्याशिवाय खरेदी करण्यात आला.
तसेच शेतकरी तथा लासूर घोडगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील यांनी त्यांचा कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणला असता त्या कापसात ग्रेड लावण्यावरून ग्रेडर व त्यांच्यात वाद झाला. त्याच वेळेस चोपडा येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय पाटील यांनीही कापूस मोजण्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी हरीश पाटील यांनी वाद मिटवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नीळकंठ सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता मी सभेत बसलेलो आहे. मला यायला उशीर लागेल, असे सोनवणे यांनी सांगितल्याने घटनास्थळी वाद सुरूच राहिला. त्यावरही शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली. भेदभाव केला जात असल्याच्या कारणावरून शेतकºयांनी कापूस खरेदी वर असलेले ग्रेडर अब्दुल सलीम, शासकीय कापूस खरेदी केंद्राचे कनिष्ठ प्रभारी राज रेड्डी आणि अकाउंंट दीपक बघे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. अखेर तीन तासांनंतर पत्रकारांनी मध्यस्थी करीत दोघांमध्ये शांतता प्रस्थापित केली आणि कापूस मोजणीला सुरुवात झाली.
तसेच ९ जानेवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाने यंत्रणेवर दबाव आणून कवडी असलेला कापूस व कोणत्याही ग्रेडमध्ये न बसणारा कापूस यंत्रणेला मोजण्यास भाग पाडले. यावरून शेतकºयांमध्ये मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली होती. सर्वसामान्य शेतकºयांना आर्द्रता दाखवली जाते आणि वजनदार लोकांचा मात्र खराब कापूस मोजला जातो. हा कुठला न्याय आहे, अशीही भावना शेतकºयांनी व्यक्त केली.
शेतकºयाकडून प्रति वाहन घेतले १५० रुपये
यावेळी शेतकºयांनी तक्रार करताना सांगितले की शेतकºयांकडून प्रति वाहन कापूस मोजण्यासाठी दीडशे रुपये घेतले जातात. वास्तविक असा कोणताही नियम नसताना शेतकºयांची ही लूट नाही का, असा प्रश्न यावेळेस शेतकºयांनी उपस्थित केला. म्हणून प्रति वाहन घेतले जाणारे १५० रु. बंद व्हावेत, अशीही मागणी झाली.
कापूस मोजणी केंद्र हप्त्यातून पाच दिवस सुरू राहावे
याच वेळेस हप्त्यातून केवळ शुक्रवार आणि शनिवार हे दोनच दिवस कापूस खरेदी केंद्र सुरू असल्याने बाहेर तालुक्यातील केंद्रावर शेतकºयांना जावे लागत असल्याने शेतकºयांचे खूप हाल होत आहेत. म्हणून पाच दिवस कापूस खरेदी केंद्र सुरू राहण्याची मागणीही शेतकºयांनी केली.
यावेळी कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांमध्ये विजय रमेश जैन (घोडगाव), तुषार साळुंखे (बुधगाव), संजय सुकलाल पाटील (चोपडा) भगवान बाबूराव चौधरी (रावेर) यासह इतर शेतकºयांचा संतप्त शेतकºयांमध्ये समावेश होता.
याबाबत जळगाव जिल्ह्याचे कापूस खरेदी केंद्राचे प्रभारी पन्नालालसिंग यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कापूस खरेदी केंद्र हप्त्यातून पाच दिवस का सुरू ठेवले जात नाही, असे विचारले असता त्या वेळेस त्यानी सांगितले की, मनुष्यबळ कमी असल्यामुळे केवळ हप्त्यातून दोनच दिवस चोपडा येथे कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवता येते. तसेच कापसाची आर्द्रता मोजण्यावरून शेतकरी व केंद्रावरील ग्रेडर यांच्यात काही काळ वाद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Pour the cotton at the farmers' shopping center at Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.