'People's Representatives' governance and link between the people: Revenue Minister Chandrakant Patil | 'लोकप्रतिनिधी' शासन आणि जनतेमधील दुवा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
'लोकप्रतिनिधी' शासन आणि जनतेमधील दुवा : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

ठळक मुद्देचाळीसगाव येथे शासकीय योजनांच्या जत्रेत लाभार्थींना विविध वस्तू, दाखले, प्रमाणपत्रांचे वितरणचाळीसावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आदेश लवकरचमराठा आक्षणाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि.९ : लोकप्रतिनिधी जागृक असेल तर तो शासनाच्या योजना आपल्या मतदार संघातील जनतेपर्यंत पोहचविण्यात यशस्वी होतो. आमदार उन्मेष पाटील यांनी कृषि महोत्सवासह शासकीय योजनांची जत्रा भरविल्याने शासन जनतेपर्यंत पोहचले आहे. चाळीसगावचा हा उपक्रम आणि आमदार पाटील हे शासन व जनतेमधील ठळक दुवा ठरले आहेत, असे प्रतिपादन महसुल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. राज्यातील विद्यमान सरकार हे जनतेचे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. यासाठी आम्ही बांधील आहोत. असेही त्यांनी ठळकपणे नमूद केले.
सोमवारी त्यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता शासकीय योजनांच्या जत्रेत लाभार्थींना विविध वस्तू, दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण झाले. यावेळी स्व. उत्तमराव पाटील विचार मंचावर खासदार ए.टी.पाटील, आमदार उन्मेष पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, शिक्षण सभापती पोपट भोळे, पं.स.च्या सभापती स्मितल बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपसभापती संजय पाटील, के.बी.साळुंखे, प्रांत अधिकारी शरद पवार, तहसिलदार कैलास देवरे आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आदेश लवकरच
चाळीसगाव येथे नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत अत्याधुनिक फिरती प्रयोग शाळा आणि सिग्नल चौकात उभारण्यात येणारा शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा या दोन्ही मागण्या आमदार उन्मेष पाटील यांनी मांडल्याचे सांगतानाच चंद्रकांत पाटील यांनी प्रयोग शाळेबाबत जागेवरच जिल्हाधिका-यांना सुचना दिल्या तर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याबाबत तातडीने बैठक घेऊन आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. अश्वरुढ पुतळ्याची फाईल सापडली असून हा प्रश्न लवकरच सुटेल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी अजून प्रतिक्षा करा, असेच सुतोवाच केल्याचा सूर यावेळी उमटला. मराठा आक्षणाचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वस्तू, दाखले आणि प्रमाणपत्रांचे वितरण
यावेळी शासकीय जत्रेत सहभागी होऊन योजनांसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वस्तू, शाळांना ई - लर्निंग साहित्य, शेतक-यांना माती परिक्षण कीट, दाखले, प्रमाणपत्रे आणि आशा स्वयंसेविकांना सायकलींचे वाटप मंत्री पाटील यांनी केले. त्यांनी कृषि महोत्सव, शासकीय योजनांचे स्टॉल, ४३ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, खाऊ गल्ली आदी स्थळांना भेटी देऊन उपक्रमाचे कौतुक केले.

 


Web Title: 'People's Representatives' governance and link between the people: Revenue Minister Chandrakant Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.