Pandharpur Wari 2021: वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:41 PM2021-06-13T14:41:15+5:302021-06-13T15:29:24+5:30

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंधन आले असून त्याऐवजी मोजक्याच वारकऱ्यांच्या सह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जात आहे. 

Pandharpur Wari 2021: It would have been better if the government had approved the proposal of Warkaris; Said NCP Leader Eknath Khadse | Pandharpur Wari 2021: वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे

Pandharpur Wari 2021: वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे

Next

मुंबई/जळगाव: महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा आषाढी वारी सोहळा (Pandharpur Wari 2021) यंदाही कोरोनाच्या संकटात असणार आहे. कारण, यंदा फक्त दहा मानाच्या पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र मुक्ताईनगर येथून निघणाऱ्या संत मुक्ताबाई वारीची अनेक वर्षांची परंपरा पाहता आणि वारकऱ्यांची मागणी पाहता वारकऱ्यांच्या हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असता तर अधिक बरं झालं असतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थांच्या वतीने दर वर्षी संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असते यामध्ये हजारो दिंड्या पालख्या आणि वारकरी मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंधन आले असून त्याऐवजी मोजक्याच वारकऱ्यांच्या सह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जात आहे. 

संत मुक्ताबाईंची मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना होत असते अतिशय मानाच्या असलेल्या या पालखीचा साडेसातशे किलोमीटर चा प्रवास 34 दिवसांत पूर्ण होत असतो. या काळात ही अनेक गावात मुक्काम करीत जात असल्याची आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या कडून मुक्ताई पादुकांच दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही मुक्ताई पालखीला पायी जाण्यास परवानगी मिळाली नसली तरी वारीला खंड पडू नये म्हणून शंभर वारकऱ्यांच्या मध्ये बसणेही वारी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

दरम्यान, हा मानाच्या पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रस्थानाला एकुण १०० लोकांना तर इतर पालख्यांमध्ये ५० जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दोन्ही सोहळ्याचा एकुण ६० लोकांना बस ने पंढरपूर ला जाता येईल. वाखरीपर्यंत हा पालखी सोहळा बस ने जाईल तर पूजा गेल्या वेळ प्रमाणे होईल.  पूजेसाठी फक्त ५ जणांना परवानगी असेल. महाद्वार काल्याला यंदा परवानगी देण्यात आली आहे. तर रथोत्सव सध्या पद्धतीने होईल असे पवार यांनी सांगितले.

दहा मानाच्या पालख्यांची नावे:

१ -  संत निवृत्ती महाराज ( त्रंबकेश्वर )

२ -  संत ज्ञानेश्वर महाराज ( आळंदी )

३ -  संत सोपान काका महाराज ( सासवड ),

४ -  संत मुक्ताबाई ( मुक्ताईनगर )

५ -  संत तुकाराम महाराज ( देहू )

६ - संत नामदेव महाराज ( पंढरपूर )

७ - संत एकनाथ महाराज ( पैठण )

८ - रुक्मिणी माता ( कौडानेपूर -अमरावती )

९ - संत निळोबाराय ( पिंपळनेर - पारनेर अहमदनगर )

१० - संत चांगटेश्वर महाराज ( सासवड ) 

Web Title: Pandharpur Wari 2021: It would have been better if the government had approved the proposal of Warkaris; Said NCP Leader Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.