चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 05:06 PM2019-11-01T17:06:44+5:302019-11-01T17:08:09+5:30

वाघडू येथे अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे शुक्रवारी सकाळी सुरू झाले.

Panchanam started at Waghdu in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथे पंचनामे सुरू

चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथे पंचनामे सुरू

Next

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाघडू येथे अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा अशा सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्यानंतर वाघडू व परिसरात शुक्रवारी सकाळी शेतात जाऊन पंचनामे सुरू झाले.
तलाठी राकेश राठोड यांनी शेतांत जाऊन पंचनामा केला व पाहणीही केली. यावेळी, राहुल पाटील, सरपंच रवींद्र पाटील, अशोक पाटील, शेतकरी पीतांबर पाटील, प्रभाकर पाटील, माधवराव पाटील, निंबा पाटील, दादा पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

 

Web Title: Panchanam started at Waghdu in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.