प्रेमप्रकरणाच्या रागातून जन्मदात्यांनी केला मुलीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 10:03 PM2020-02-21T22:03:03+5:302020-02-21T22:03:13+5:30

तळवेलची घटना : समाजातील मुलाशी लग्नास दिला होता नकार

Out of love rage, the parents murdered the girl | प्रेमप्रकरणाच्या रागातून जन्मदात्यांनी केला मुलीचा खून

प्रेमप्रकरणाच्या रागातून जन्मदात्यांनी केला मुलीचा खून

Next

वरणगाव, ता. भुसावळ : प्रेमप्रकरणास आईवडिलांनी केलेला विरोध हा तळवेल येथील मुलीने न जुमानल्याने जन्मदात्यांनीच आपल्या मुलीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तळवेल येथील रहिवाशी सुधाकर पाटील यांची मुलगी निकीता हिचे गावातीलच युवक गणेश निवृत्ती राणे याच्या सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. ही कुणकुण दिड वर्षापूर्वी लागली होती. त्यावेळी मुलीच्या आईवडिलांनी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या अनुशंगाने गणेश याला भुसावळ न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षाही केली होती. तरी सुद्धा गणेशने प्रेम प्रकरण पुन्हा सुरूच ठेवले होते. यास वैतागून या दाम्पत्याने निकिताचा विवाह ती अल्पवयीन असतानाही खामखेडा ता. मुक्ताईनगर येथील मुलासोबत विवाह जुळवला होता. परंतु गणेशला विवाह होऊ द्यायचा नाही म्हणुन त्याने वधुपक्ष व वरपक्षांविरुद्ध बालविवाह कायद्याअंतर्गत भुसावळ न्यायालयात कागदोपत्री अर्ज केला होता. न्यायालयाकडून दोघांना नोटिस देण्यात आली होती. यामुळे हतबल झालेल्या निकिताच्या आईवडिलांनी निकिताची १९ रोजीच्या रात्री झोपेतच गळा आवळून हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. निकिताचे शव ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिच्या अंगावर मारहाणीच्याही खुणा होत्या. यावरुन लगेच हा मृत्यू संशयास्पद वाटला. शवविच्छेदन अहवालातही गळा आवळल्याचे लक्षात आल्याने पोलिसी खाक्या दाखवताच सर्व माहिती २१ रोजी पुढे आली.
या प्रकरणी सुधाकर मधुकर पाटील (वय ४६) व नंदाबाई सुधाकर पाटील (वय ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप बोरसे, पोहेकॉ मुकेश जाधव करीत आहे .

Web Title: Out of love rage, the parents murdered the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.