भालोद शाळेत आढळले केवळ दहा विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:58 PM2019-06-23T12:58:21+5:302019-06-23T12:59:12+5:30

जि.प. अध्यक्षांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना

Only ten students found in Bhalod School | भालोद शाळेत आढळले केवळ दहा विद्यार्थी

भालोद शाळेत आढळले केवळ दहा विद्यार्थी

Next

जळगाव : भालोद ता़ यावल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाहिली ते चौथीच्या वर्गात केवळ दहाच विद्यार्थी उपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी जि़ प़ अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या भेटीदरम्यान समोर आला़ येथून तात्काळ शिक्षणाधिकाºयानां संपर्क करून संबधितांवर कारवाईच सूचना अध्यक्षा पाटील यांनी दिल्या़
गावांना भेटी देण्याची मोहीम अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांन शनिवारीही राबविली यात यावल तालुक्यातील हिंगोणा, मारूळ, न्हावी, भालोद या गावांना भेटी दिल्या़ मारूळ येथे शाळा व रूग्णालयात अस्वच्छता असून स्वच्छतेच्या दृष्टीने उपयायोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले़ हिंगोणा येथील ग्रामपंचायत बंद होती़ मात्र, आरोग्य केंद्रात उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्यात येत होती़ हिंगोणा येथे शाळेत ४७ विद्यार्थी होते़ भालोद शाळेत दहा विद्यार्थी व दोनच शिक्षक हजर होते़ गेल्या पाच वर्षांपासून अशीच स्थिती असल्याचे शिक्षकांनी यावेळी अध्यक्षांना सांगितले़ पहिलीत २, दुसरीत ५, तिसरीत -२, चौथतीत १ विद्यार्थी उपस्थित होता़ जिपच्या अध्यक्षा कोण याचीही माहिती येथील शिक्षकांना नव्हती़
भालोद आरोग्य केंद्राची दुर्दशा
भालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धूळ साचलेली होती़ तीनच कर्मचारी याठिकाणी उपस्थित होते़ हा प्रकार पाहून अध्यक्षा पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांना संपर्क करून चौकशीचे आदेश दिले आहेत़

Web Title: Only ten students found in Bhalod School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.