Once again Modi wave was the result of the waves | पुन्हा एकदा मोदी लाटेचा जाणवला परिणाम
पुन्हा एकदा मोदी लाटेचा जाणवला परिणाम

जळगाव : भाजपाने जिल्ह्यातील दोन्ही जागा कायम राखल्या आहेत. मात्र यंदा किमान एका ठिकाणी तरी बदल होईल, अशी अपेक्षा विरोधकांना होती. परंतु दोन्ही ठिकाणीही मोठ्या फरकाने पराभव झाल यामुळे विरोधक अवाक झाले असून सत्ताधाऱ्यांसह त्यांनीही मोदी लाट पुन्हा एकदा चालल्याची कबुली दिली आहे.
उत्तमराव पाटील यांच्यापासून विजयाची परंपरा आजही कायम आहे. उन्मेष पाटील यांना आमच्या अपेक्षेपेक्षा निश्चितच जास्त मतदान मिळाले असून हा युतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.
- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची यावेळीही सुप्त लाट होती. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात युतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले, याचा आनंद असून त्यासाठी मतदारांना धन्यवाद.
-सुरेशदादा जैन, माजी मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा हा विजय आहे. नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू
-सुरेश भोळे,आमदार
मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मतदानाचा रेषो एकसारखाच होता. त्यामुळे हा संशोधनाचा विषय आहे. प्रचारादरम्यान मिळालेल्या प्रतिसादावरून एवढा पराभव होणे शक्यच नाही.
- गुलाबराव देवकर, राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार
जनतेने दिलेला कौल मान्य आहे. उमेदवारी उशिरा झाल्याने प्रचाराला वेळ कमी मिळाला. पराभवाचे चिंतन करु, तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू.
-डॉ.उल्हास पाटील, कॉँग्रेसचे उमेदवार
पंतप्रधान मोदींनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजना तसेच खासदार खडसे यांनी तालुक्यात सतत ठेवलेला संपर्क तसेच गरिबांची केलेली कामे व कार्यकर्त्यांची फळी हे विजयाचे गणित आहे.
- हरिभाऊ जावळे, आमदार रावेर-यावल विधानसभा
जनतेने नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी दिली. चांगल्या कामाला ही संधी आहे. राज्यात आणि देशात भाजप, शिवसेना आणि हिंदुत्ववाद जपणाºया पक्षाला मतदारांनी पुन्हा संधी दिली.
- प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार चोपडा विधानसभा
रक्षा खडसे यांना भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ४५ हजार पेक्षाही जास्त मताधिक्य मिळणार, असा मी व्यक्त केलेला अंदाज अचूक खरा ठरला आहे. त्याचप्रमाणे मतदारांनी पंतप्रधान मोदी व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर हा विश्वास टाकला.
-संजय सावकारे,
आमदार, भुसावळ
अमळनेर तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देईन, असा शब्द आपण पक्षश्रेष्ठींना दिला होता, आणि तो पाळला. पक्षातीलच काही फितूर झाले होते, त्याचा परिणाम झाला नाही.
-शिरीष चौधरी,
आमदार, अमळनेर विधानसभा
हे यश अन्य कोणत्याही नेत्याचे नसून फक्त मोदी यांचे आहे. त्यांनी दाखविलेले स्वप्न या पाच वर्षात तरी पूर्ण होईल, असा आशावाद जनतेला आहे. पाहूया ते काय करतात?
-डॉ. सतीश पाटील, आमदार, एरंडोल- पारोळा विधानसभा.
गेल्या तीस वर्षांपासून पाचोरा- भडगाव मतदारसंघातून लोकसभेसाठी युतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य मिळाले असून यंदाही ७५ हजारापेक्षा जास्त लीड दिला आहे. मोदींवर पुन्हा जनतेने विश्वास दाखविला.
-किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव विधानसभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारांवरील प्रभाव कायम असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे संघटन तसेच जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन यामुळे अपेक्षित विजय मिळू शकला.
- स्मिता वाघ, आमदार, विधानपरिषद
पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा कायम आहे. यासाठी पक्षाध्यक्ष शहा यांचीही मोलाची साथ लाभली अूसन राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस, नेते गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन याचबरोबवर कार्यकर्त्यांची मेहनत यामुळे हे यश मिळू शकले.
- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजपा
दोन्ही ठिकाणी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली होती. परंतु आमच्या पराभव झाला. निकाल धक्कादायक असून पराभवाचे चिंतन करून पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ.
-अ‍ॅड. संदीप पाटील,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
परावभ होईल असे वाटत नव्हते. पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनापासून काम केले. जनतेच कौल स्विकारत चिंतन केले जाईल.
-अ‍ॅड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
बहुतांशी ग्राम पंचायती, नगरपालिका, पंचायत समित्या, जि.प. या यूतीच्या ताब्यात आहेत.तसेच राज्य व केंद्र सरकाची विकासकामे यामुळे मतदार आकृष्ठ झाले. तरुण मतदारांना मोदींची क्रेझ भावली.
-गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमूख.


Web Title: Once again Modi wave was the result of the waves
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.