नोट्स शस्त्रक्रिया ठरतेय स्त्री रुग्णांंसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:19 AM2021-01-19T04:19:46+5:302021-01-19T04:19:46+5:30
जळगाव : नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने खान्देशवासींसाठी उपलब्ध करून दिलेली ‘नोट्स’ (नॅचरल ओरिफाइस ट्रान्सल्युमिनल एन्डोस्कोपिक सर्जरी) ही शस्त्रक्रिया ...
जळगाव : नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने खान्देशवासींसाठी उपलब्ध करून दिलेली ‘नोट्स’ (नॅचरल ओरिफाइस ट्रान्सल्युमिनल एन्डोस्कोपिक सर्जरी) ही शस्त्रक्रिया स्त्रीरुग्णांसाठी वरदान ठरत आहे. डॉ. सुयश नवाल (डीएनबी-स्त्रीरोग आणि दुर्बिण शस्त्रक्रियातज्ज्ञ) यांनी स्त्रियांमधील अनेक आजारांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत ‘नोट्स’ शस्त्रक्रिया खान्देशात सर्वप्रथम उपलब्ध करून दिली असून, यामध्ये पोटावर टाके किंवा चिरे न पाडता नैसर्गिक प्रवेशमार्गाचा (योनीमार्ग) उपयोग करून दुर्बिणीद्वारे चिरेविरहित ही शस्त्रक्रिया करण्यात येते. ‘नोट्स’ शस्त्रक्रिया गर्भाशय काढणे, अंडाशय काढणे, गर्भनळ्या काढणे, गर्भनळ्यांत चुकून थांबलेले ग्रभ काढणे, अंडाशयातील गाठ काढणे, गर्भाशयातील फायब्रॉइडची गाठ काढणे, बाहेर येणारे गर्भाशय आणि योनीमार्ग दुरुस्त करणे यासारख्या आजारांवर केली जात असून डॉ. सुयश नवाल ती प्राधान्याने करतात. अधिक माहिती वेबसाइटवरही उपलब्ध आहे, असे नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे कळविण्यात आले आहे.