भुसावळात रात्री गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:19 AM2020-07-10T00:19:20+5:302020-07-10T00:21:03+5:30

आंबेडकर नगरातील ज्ञान केंद्राजवळ तरुणावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.४० वाजता घडली.

Night shooting in Bhusawal | भुसावळात रात्री गोळीबार

भुसावळात रात्री गोळीबार

Next
ठळक मुद्दे१९ वर्षीय तरुण जखमीअज्ञात व्यक्तीकडून झाला गोळीबारहल्ल्याचे कारण अज्ञात

भुसावळ : शहरातील आंबेडकर नगरातील ज्ञान केंद्राजवळ तरुणावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.४० वाजता घडली. त्यात आदित्य संजय लोखंडे (वय १९, रा.आंबेडकर नगर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनुसार, शहरातील रेल्वे हॉस्पिटलजवळील आंबेडकर नगर, ज्ञानकेंद्राजवळ या तरुणावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी हे जखमींची जाब-जबाब घेण्यासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये रवाना झाले आहे. या प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Night shooting in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.