सरकारच्या खासगीकरण विरोधात सीआरएमएस संघटनेचे देशव्यापी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 08:53 PM2020-08-10T20:53:36+5:302020-08-10T20:54:54+5:30

सीआरएमएस संघटनेतर्फे संपूर्ण रेल्वे विभागांमध्ये ‘रेल्वे बचाव’च्या समर्थनार्थ व शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात काळ्या फिती लावून निदर्शने केली.

Nationwide agitation of CRMS organization against privatization of government | सरकारच्या खासगीकरण विरोधात सीआरएमएस संघटनेचे देशव्यापी आंदोलन

सरकारच्या खासगीकरण विरोधात सीआरएमएस संघटनेचे देशव्यापी आंदोलन

Next
ठळक मुद्देकाळ्या फिती लावून सरकारच्या धोरणाचा केला निषेधदेशभर आंदोलने

भुसावळ : रेल्वेच्या इतिहासात कधी नव्हे अशा पद्धतीने मोदी सरकार रेल्वेचे खासगीकरण करीत आहे. याविरोधात सीआरएमएस संघटनेतर्फे संपूर्ण रेल्वे विभागांमध्ये ‘रेल्वे बचाव’च्या समर्थनार्थ व शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाच्या विरोधात काळ्या फिती लावून निदर्शने केली.
सीआरएमएस रेल्वे संघटनेचे मंडळ अध्यक्ष व्ही.के. समाधीया, मंडळ सचिव एस.बी.पाटील, वर्कशॉप मंडल सचिव पी.एन.नारखेडे यांच्यासह बी.आर.धाकडे, एस.के.दुबे, तोरणसिंग यांच्या उपस्थितीत जोरदार निदर्शने करण्यात आली. रेल्वेचे खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत रद्द करा, रेल्वेस्टेशन विकणे रद्द करा, रेल्वे कर्मचाऱ्यांना गठित केलेला डीए लागू करा, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित लागू करा. ट्यूशन भत्ता बंद करण्याची साजिश बंद करा, रेल्वे उद्योगपतींच्या हाती विकू नका आदी घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: Nationwide agitation of CRMS organization against privatization of government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.