रेल्वेखाली उडी घेत नांदगाच्या तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:09 PM2020-12-05T16:09:56+5:302020-12-05T16:23:07+5:30

शालीक होता कुटुंबातील कर्ता

Nandga youth commits suicide by jumping under train | रेल्वेखाली उडी घेत नांदगाच्या तरुणाची आत्महत्या

रेल्वेखाली उडी घेत नांदगाच्या तरुणाची आत्महत्या

googlenewsNext

बोदवड : तालुक्यातील बोदवड रेल्वे स्थानकावजवळ  नांदगाव येथील ३२ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
तालुक्यातील  नांदगाव येथील शालीक दादाराव पालवे (वय ३२) या तरुणाने शुक्रवारी रात्री बोदवड रेल्वे स्थानकाच्या गेट क्रमांक ७ जवळ मुंबई -नागपूर  डाऊन मार्गाच्या खांब क्रमांक ४७४/३२ ते ४७४/ ३६ दरम्यान  विदर्भ एक्सप्रेस खाली आत्महत्या केली असल्याची घटना  सकाळी उघडकीस आली.  याबाबात भुसावळ लोहमार्गचे औरंगाबाद कार्यलयाचे उप निरीक्षक बबन शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, तर बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.  असून सदर तरुणाने आत्महत्या केल्याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास भुसावळ लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
शालीक होता कुटुंबातील कर्ता
शालीकचे वडील अनेक वर्षापासून हयात नसून  दोन भाऊ व आईसह तो नांदगाव मध्ये राहत होता व  खासगी वाहनावर चालक होता.  याद्वारे तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याचे लग्न ही झालेले नव्हते. कुटुंबातील कर्ता मुलगा मृत पावल्याने हा परिवार उघड्यावर पडला आहे. 

Web Title: Nandga youth commits suicide by jumping under train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.