एकाच घरात खासदार व आमदार मग इतरांनी सतरंज्या उचलायच्या काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 04:38 PM2019-10-17T16:38:57+5:302019-10-17T16:39:04+5:30

बोदवड येथे सभा : अमोल कोल्हे यांचा खडसेंना टोला

MPs and MLAs in one house. | एकाच घरात खासदार व आमदार मग इतरांनी सतरंज्या उचलायच्या काय..

एकाच घरात खासदार व आमदार मग इतरांनी सतरंज्या उचलायच्या काय..

Next




बोदवड : एकाच घरात खासदार आणि आमदार मग त्यांच्या कार्यकर्त्यानाही प्रश्न पडलाय की, आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायच्यात काय? असा टोला राष्टÑवादी कॉँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी गुरूवारी येथे आयोजित जाहीर सभेत भाजपा नेते, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना लगावला.
शहरातील गांधी चौकात राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील, युवक कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हितेश पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक, विनोद तराळ, डॉ. उद्धव पाटील, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजू वानखेडे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात कोल्हे हे खडसेंचे नाव न घेता पुढे म्हणाले, तुमच्या वयाचा आदर करतो तुम्ही चंद्रकांत पाटील यांना गुंड म्हणतात पण तीस वर्षाचा अत्याचार सहन करून थंड बसण्यापेक्षा हक्कासाठी गुंड बनले तर काय हरकत आहे, यापुढे ज्या पक्षात तुम्हाला जागा नाही तर तुमच्या वारसांना काय जागा मिळणार ? असा सवालही त्यांनी खडसे यांना केला. मतदारांना ते म्हणाले की, तीस वर्षे तुमचं भविष्य या मंडळींनी खडड्यात घातले असून त्यांना आता घरी बसवा.
शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना फसवी असून कर्ज माफीसाठी महाराजांचे नाव वापरले पण सरसकट कर्ज माफी झाली नाही. त्यांनी कर्जमाफीसाठी फिरवलं तर तुम्ही त्यांना मतासाठी फिरवा अशी टीकाही कोल्हे यांनी केली.
गुजराथ राज्यात सरदार वल्लभभाईंचा स्टॅच्यू चार हजार कोटींचा खर्च करून उभा रहातो पण आमच्या कडे अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभे रहात नाही? इंदू मिलला डॉ. बाबासाहेबांच स्मारक उभे रहात नाही ? केवळ आश्वासने ही मंडळी देते आहे, अशीही टीका त्यांनी केली.
राज्यातील समस्येंशी कलम ३७०चा काय संबंध ?
परळी येथे नरेंद्र मोदी यांची सभा होती. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या समाधीकडे ते गेले नाहीत, अशी भाजपची नीती असून भाजप केवळ जाहिरात पार्टी आहे अशी टीकाही त्यांनी केली. कलम ३७० चांगले आहे पण त्यासाठी राज्यातील कर्ज माफी मागू नये का, तसेच बोदवड मुक्ताईनगर ला एमआयडीसी नको का असे सांगत राज्याच्या समस्याशी कलम ३७० चा काय संबंध अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी उमेदवार चंद्रकांत पाटील, राजू वानखेडे (सावदा) यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: MPs and MLAs in one house.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.